सत्ताधारी महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत;असे का म्हणाले जयंत पाटील

The rulers are going to make Maharashtra worse than UP Bihar; said Jayant Patil

 

 

 

 

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का ? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत

 

 

असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर प्रहार केला.

 

 

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते.

 

 

 

यावेळी त्यांनी शिवीगाळही केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे येथील कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली होती.

 

 

हे प्रकरण शांत होत नाही तोच काल मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांची एका बैठकीतच एकमेकांना शिवीगाळ करणारा ऑडियो व्हायरल झाला. या प्रकरणांवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

 

 

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठय़ा नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला आहे.

 

 

 

या नेत्यांनी कधी आपली पातळी खाली जावू दिली नाही. मात्र आज सत्तेत सामील असलेले मंत्री, आमदार, खासदार कधी सामान्य माणसांवर लाठीचार्ज करायला सांगतात,

 

 

 

कधी पोलीस बांधवांच्या कानशीलात लगावतात तर कधी एकमेकांचा पानउतारा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत हे महाराष्ट्र बघतोय ! असं म्हणत त्यांनी निषेध केला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *