शिंदे गटाच्या बाजूने निकालाचा अजित पवार गटालाही होणार फायदा

Ajit Pawar group will also benefit from the result in favor of Shinde group ​

 

 

 

 

 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता अजित पवार गटाच्या भवितव्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.

 

 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे.

 

 

त्यांच्या या निर्णयानंतर आता अजित पवार गटाच्या भवितव्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. ताजा निकाल अजित पवार गटासाठी दिशादर्शक असेल असं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेसच्या दोन गटांपैकी अजित पवार गटाला अध्यक्षांकडून झुकते माप मिळू शकते.

 

 

 

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचा निकाल जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल नार्वेकर यांनी सुद्धा ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सुतोवात केले आहेत.

 

 

 

शिंदे गटाच्या निकालाप्रमाणे अजित पवार गटाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जातंय.

 

 

 

एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे शिवसेनेतून फुटून बाहेर आले, त्याप्रमाणे अजित पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत.

 

 

अजित पवार गटाने आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसेच अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलाय.

 

 

शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणेच ही स्थिती आहे. त्यामुळे आजच्या निकालाचा आधार घेऊन अजित पवार गटाचा देखील निकाल लागू शकतो.

 

 

शिंदे गटाकडून पक्ष आमचाच असा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाचा असल्याचा निकाल दिला होता.

 

त्यामुळे याच निकालाचा आधार घेऊन अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देतील अशी शक्यता होती. त्याप्रमाणे त्यांनी निकाल दिला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *