TV चॅनेलच्या बातम्या LIVE सुरु असतांना स्टुडिओत गॅंगस्टरनी अँकरला लावली बंदूक आणि ….पाहा VIDEO
Gangsters put a gun on the anchor in the studio while the news of the TV channel was going LIVE and .... WATCH VIDEO
इक्वाडोर देशातून एक गंभीर बातमी समोर आली आहे. याठिकाणी बंदूकधारी गुंडांचा हैदोस वाढत चालला आहे. या गुंडांनी चक्क एक न्यूज चॅनलच्या स्टुडिओवरच हल्ला करून,
आतील लोकांना बंधक बनवलं. विशेष म्हणजे यावेळी बातम्यांचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतं. त्यामुळे हायजॅकिंगचा हा प्रकार कित्येक लोकांनी लाईव्ह पाहिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
टीसी टेलिव्हिजन असं या चॅनलचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे. या चॅनलचे न्यूज हेड अलीना मॅनरिक यांनी सांगितलं, की ते स्टुडिओच्या समोरील कंट्रोल रुममध्ये होते.
यावेळी अचानक मास्क लावलेले काही बंदूकधारी गुंड इमारतीत शिरले. त्यातील एका व्यक्तीने माझ्यावर बंदूक रोखली आणि जमीनीवर बसायला सांगितलं. अशाच प्रकारे इतरांनाही बंधक बनवण्यात आलं.
साधारणपणे 15 मिनिटे हा सगळा प्रकार लाईव्ह टेलिकास्ट होत होता. त्यानंतर प्रसारण थांबवण्यात आलं. यानंतर इमारतीला पोलिसांनी वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच हे गुंड तिथून पळून गेले.
इक्वाडोरच्या तुरुंगातून एक कुख्यात ड्रग माफिया तुरुंगातून पळून गेला आहे. त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी गुंडांच्या टोळ्या हल्ला करत आहेत.
कित्येक पोलिसांचं अपहरण करण्यात आलं आहे, आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती डॅनिअल नोबोआ यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. देशातील गँगस्टर समूहांनी देखील सरकारविरोधात युद्धाची घोषणा केली आहे.
टीव्ही चॅनलचं हायजॅकिंग प्रकरण समोर आल्यानंतर आता सरकारने या सर्व समूहांना दहशतवादी घोषित केलं आहे.
BREAKING: Gunmen storm TV channel in Ecuador, take hostages pic.twitter.com/UYQrYoOBcC
— BNO News (@BNONews) January 9, 2024