…… तर सरकारमधून बाहेर पडू,बच्चू कडूंचे सूचक विधान
..... So get out of the government, an indicative statement of Bachu Kadu

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटासह ते भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले.
एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रायल देण्याचं आश्वासन दिलं म्हणून मी सत्तेत सहभागी झालो. उद्धव ठाकरेंकडे दिव्यांग मंत्रायलयाचा प्रस्ताव दिला होता.
पण त्यांनी अडीच वर्षांच्या काळात काहीच निर्णय घेतला नाही. महायुतीबरोबर गेल्याने माझ्या मतदारसंघातील विकास कामं होणार असतील, तर मी तिकडे गेलं पाहिजे, म्हणून मी तिकडे गेलो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कधीपर्यंत राहणार? असं विचारलं असता बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू.
ते मुख्यमंत्री नसतील तर आम्ही त्यांना तसं सांगून देऊ. तुम्ही मुख्यमंत्री राहा, आम्ही कायम तुमच्याबरोबर राहतो, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
एकनाथ शिंदेंच्या कामाचं कौतुक करत बच्चू कडू पुढे म्हणाले, “ज्या माणसाने मागणी न करता दिव्यांग मंत्रायल दिलं. जेवता जेवता आम्ही फक्त त्यांना आठवण करून दिली आणि त्यानंतर त्यांनी लगेच मुख्य सचिवांना फोन केला. कॅबिनेटमध्ये फाईल आली आणि दिव्यांग मंत्रालय झालं.
ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, त्याच्यासाठी देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय उभारलं, हा इतिहास घडला. इतिहासात एक कार्यकर्ता म्हणून माझं नाव घेतलं जातं, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे.
दिव्यांग मंत्रालयाचे अनेक मंत्री होतील. पण दिव्यांगांच्या मनात बच्चू कडूंचं थेट नाव कोरलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. भिंतीवरचं नावं कोण पाहत बसेल, कार दिव्यांगांच्या मनात बच्चू कडूंचं नाव आहे.”
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोपी विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत ईडीने एकाही भाजपाच्या नेत्यावर कारवाई केल्याच माहितीत नाही. यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी थेट भाजपाला सवाल विचारला आहे.
भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून का चौकशी केली जात नाही? याचं उत्तर भाजपाने द्यायला हवं, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. ते एका खाजगी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, “समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते.
पण राजकीय नेते चुकले तर तुम्ही ताळ्यावर आणलं पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडलं पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचं काहीच बरं-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा.”
तुम्हाला असं वाटतं का की, जे लोक खरं बोलतात, त्यांच्यामागे ईडी लावली जाते? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी तर आता भाजपाबरोबर आहे. पण भाजपावाल्यांना माझा प्रश्न आहे.
माझा सरळ प्रश्न आहे. ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो.
ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत.