OBCविरोधात बाबा रामदेव यांचा व्हिडीओ व्हायरल; रामदेव अडचणीत,देशभरात सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरूBaba Ramdev’s video against OBC goes viral; Ramdev in trouble, trolling on social media across the country
Baba Ramdev's video against OBC goes viral; Ramdev in trouble, trolling on social media across the country
योगगुरू बाबा रामदेव अनेकदा त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादात सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा त्यांच्या आयुर्वेदिक औषधांवरही आक्षेप घेतल्याचं दिसून आलं.
पतंजलीच्या व्यापक व्यवसाय वृद्धीमुळे रामदेव बाबा कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात त्यांच्या तोंडी असणारे संवाद चर्चेचा व पर्यायाने वादाचा विषय ठरले आहेत.
३० सेकंदाचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला जात असून त्यावर #बाबारामदेवमाफ़ी_मांगो असा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला आहे.
हा व्हिडीओ एका वाहिनीवरचा असून त्यात रामदेव बाबा प्रवचन देताना दिसत आहेत. बाबा रामदेव यांच्या प्रवचनातला फक्त २९ सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओची सुरुवात बाबा रामदेव “मेरा पूर्व गोत्र ब्रह्म गोत्र है” असं म्हणताना होत आहे. पुढे “मैं अग्निहोत्री ब्राह्मण हूँ मैं. बोले बाबाजी आप तो ओबीसी हो.
ओबीसीवाले ऐसी-तैसी कराए. मैं हूँ अग्निहोत्री ब्राह्मण, मैं हूँ वेदी ब्राह्मण, मैं हूँ द्विवेदी ब्राह्मण, मैं हूँ त्रिवेदी ब्राह्मण और मैं हूँ चतुर्वेदी ब्राह्मण.. चार वेद मैंने पढे है”, असं बाबा रामदेव म्हणत असल्याचं या व्हिडीओत ऐकू येत आहे.
बाबा रामदेव यांचा हा व्हिडीओ सध्या एक्सवर (ट्विटर) तुफान व्हायरल होत आहे. बाबा रामदेव यांनी ओबीसी समुदायाचा अवमान केल्याचा दावा
अनेक युजर्स करत आहेत. तसेच, #बाबारामदेवमाफ़ीमांगो, #मुझेओबीसीहोनेपरगर्वहै असे हॅशटॅगही ट्रेंड होताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला, तरी याची सत्यासत्यता अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भात बाबा रामदेव यांच्याकडून वा पतंजलीकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
शिवाय, या व्हिडीओतील वाक्ये ही बाबा रामदेव प्रवचनामध्ये स्वत:ची म्हणून सांगत होते की इतर कोणत्या प्रसंगाचं विश्लेषण करताना सांगत होते, याविषयीही अद्याप कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही.
एक विवेकानंद जी थे और एक ये वेदी जी हैं @yogrishiramdev देश में माहौल चलाया जा रहा है जातिवाद और आरक्षण ख़त्म करने का लेकिन सच्चाई आपके सामने है आरक्षण ही है जिसने प्रतिनिधित्व दिया है हर जाति को आगे आने का।#Boycott_Patanjali#बाबा_रामदेव_माफ़ी_मांगो #मुझे_ओबीसी_होने_पर_गर्व_है pic.twitter.com/8zPzcCT4pp
— Rajendra Gujar (@RajendraGujar04) January 13, 2024