छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, म्हणाले ‘एवढी मस्ती कुठून आली?

Chhagan Bhujbal attacked Jarangs and said, 'Where did all this fun come from?

 

 

 

 

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

 

 

 

बीडमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर जोरदार भाषण केलं.

 

 

 

किती घाणेरडा माणूस आहे हा, काही सुसंस्कृतपणा आहे की नाही? काहीही बोलणार? तोंड दिलंय देवाने म्हणून काहीही बोलणार का?

 

 

 

एवढी मस्ती कुठून आलीय रे बाबा? असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर झणझणीत टीका केली.

 

 

 

गोपीनाथ मुंडे असते तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते. ओबीसीच्या नशिबी दुर्दैव आलंय. दोन महिने माझ्याविरुद्ध शिवीगाळ सुरू होती मी काही बोललो नाही.

 

 

 

बीडमध्ये जाळपोळ सुरू झाली त्यावेळी मी एसपींना फोन केला. योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस जाळले घरावर हल्ला झाला.

 

 

 

मजहब नही सिखा था आपस मे बैर करना, ज्या मुस्लिम बांधवांनी क्षीरसागर कुटुंबीयांच्या मुलांना आणि परिवारातील महिलांना बाहेर काढलं त्यांचा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सत्कार केला.

 

 

 

 

 

माणुसकी खरा धर्म काय आहे हे या सर्वांनी दाखवून दिलं. पेटवणारे लोक जय शिवाजी जय जिजाऊ घोषणा देत घराला आगी लावत होते.

 

 

 

बीडमध्ये जाळपोळीत ज्यांचं घर जळाले ते संदीप क्षीरसागर यांना घेऊन रोहित पवार हे जरांगे भेटीला कशाला भेटीला गेले? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

 

 

 

 

छत्रपतींचे नाव घेतलं जातंय आणि आमच्यावरच हल्ले केले जात आहेत. आमचे ओबीसी नेते बहाने सांगत आहेत, असं म्हणत छगन भुजबळांनी नाव न घेता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

 

 

 

तुम्ही फिरफिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार. बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्याला प्रवृत्त कोणी केलं? जालन्यात मागील दोन महिन्यात 200 गावठी पिस्टल आलेत. यांचा काय प्लॅन शोधून काढा. याच्या मागे कोण आहे हे शोधून काढा, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

 

 

 

दरम्यान, अनेकजण म्हणतात तुम्ही सरकारमध्ये आहात.. हो मी सरकारमध्ये आहे तिथेही बोलतो आणि इथे बोलतोय तेही सरकार पाहत..

 

 

 

पंतप्रधान नाशिकमध्ये आले पण नाशिक बंदचा आदेश कुणी काढला नाही, पण यांच्या सभेसाठी शाळा बंद असं का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *