रोहित पवार यांना ईडीचे बोलावणे ; 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
ED summons Rohit Pawar; Ordered to appear for inquiry on January 24
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
आआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतचं त्यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आलीये.
दरम्यान मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय,
त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. त्यामुळे
आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यानंतर रोहित पवार चौकशीला हजर राहणार हे पाहणं देखील गरजेचं ठरेल.