स्टंट बाजीच्या नादात कंपनीच्या सीईओंचा जीव गेला ;पाहा VIDEO

The CEO of the company lost his life in the sound of the stunt; watch the video ​

 

 

 

 

 

 

 

हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अपघात होऊन, एका कंपनीच्या सीईओंना आपला जीव गमवावा लागला होता.

 

 

व्हिस्टेक्स एशिया या कंपनीचा सिल्व्हर ज्युबली सोहळा याठिकाणी सुरू होता. या दुर्घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

 

 

 

Vistex Asia या कंपनीने आपल्या सिल्व्हर ज्युबली कार्यक्रमासाठी रामोजी फिल्म सिटीमधील हॉटेल आणि स्टेज बुक केले होते. या कार्यक्रमाला सुमारे 700 लोक उपस्थित होते.

 

 

यावेळी कंपनीचे फाउंडर सीईओ संजय शाह आणि कंपनीचे प्रेसिडेंट राज डाटला यांनी ग्रँड एन्ट्री करण्याचा प्लॅन केला होता. मात्र, यावेळीच ही भीषण दुर्घटना झाली.

 

 

 

ठरलेल्या प्लॅननुसार कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडेंट एका काँक्रीट स्टेजवर बनवलेल्या पिंजऱ्यात उभे होते. हा पिंजरा क्रेनच्या सहाय्याने सुमारे 20 फूट उंच उचलण्यात आला होता.

 

 

याच्या दोन्ही बाजूला फटाक्यांनी आतषबाजी सुरू होती. काही वेळ हा पिंजरा वर ठेऊन, नंतर हळू-हळू खाली आणण्यात येणार होता.

 

 

 

मात्र हा पिंजरा हवेत असतानाच, याला असलेली तार तुटली आणि हे दोघेही वरुन खाली कोसळले. यानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

 

 

मात्र, उपचारांदरम्यान संजय शाह यांचा मृत्यू झाला. राज डाटला यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

 

संजय शाह यांनी 1999 साली या कंपनीची स्थापना केली होती. सध्या या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 300 मिलियन डॉलर्स एवढा आहे.

 

 

या अपघात प्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *