चोहीकडे लग्नाचीच चर्चा;नवरीला 90 कोटींचे दागिने, 30 लाखाचा मेकअप
Marriage is the talk of the town; jewelery worth 90 crores for the bride, make-up worth 30 lakhs

भारतातील सेलिब्रेटीजच्या लग्नांची चर्चा होत असते. त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग नेहमी माध्यमांमध्ये असते. सेलिब्रेटीजप्रमाणे राजकीय लोकांच्या मुलांच्या लग्नाची चर्चा होत असते.
महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या राजशाही विवाहाची चर्चा रंगली होती. परंतु त्यापेक्षा सर्वाधिक महाग विवाह समारंभ कर्नाटकात झाला होता.
2016 मधील या विवाह समारंभाची चर्चा अजूनही होत असते. कारण या लग्नात 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. हा विवाह कर्नाटकमधील राजकीय व्यक्तीमत्व माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी हिचा होता.
देशातील या रॉयल वेडिंगवर 500 कोटी रुपये खर्च झाले होते. विवाह 6 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. म्हणजेच आज त्याचा विचार केला असता किती कोटी रुपये होणार…या विवाहासोहळ्यात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता.
वधूचे कपडे आणि दागिन्यांवर कोट्यावधी रुपये खर्च झाले. विवाहात 90 कोटींचे दागिने ब्राह्मणी हिला करण्यात आला होता.
तित्या मेकअपवर 30 लाख रुपये खर्च झाले होते. लग्नातील साडीची किंमत 17 कोटी होती. त्याच्यावर सोन्याच्या तारांनी वर्क करण्यात आले होते. नेकलेस 25 कोटींचा होता.
हैदराबादमधील उद्योजक विक्रम देव रेड्डी यांचा मुलगा राजीव रेड्डी याच्यासोबत ब्राह्मणी हिचा विवाह झाला. हा विवाह सोहळा पाच दिवस चालला. विवाहासाठी वधूचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला मुंबईहून बोलावण्यात आले होते.
बंगलोरमधील 50 हून अधिक सुप्रसिद्ध मेकअप कलाकारांना पाहुण्यांच्या मेकअपसाठी बोलवण्यात आले होते. देश-विदेशातील 50,000 लोक या सोहळ्यास आले होते.
लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था शाही पद्धतीने केली होती. 1500 फाइव आणि थ्री स्टार हॉटेलच्या रुम बुक होते. विमानतळ ते विवाह स्थळापर्यंत पाहुण्यांना 15 हेलिकॉप्टर होते.
2000 टॅक्सी बुक होत्या. या विवाहाची चर्चा अजूनही होत असते. कारण या विवाहाच्या खर्चात हजारो सामान्य लोकांचा विवाह झाला असतो.