निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ;लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला होणार?

Excitement with Election Commission's letter; Lok Sabha election will be held on April 16? ​

 

 

 

 

मुंबईचे महत्व कमी करत हिरे व्यवसाय सुरतला हलवण्याच्या गुजरातच्या प्रयत्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. मोठा गाजावाजा करत सुरू झाललं गुजरात येथील सुरत डायमंड बोर्स संकटात सापडल्याचं दिसत आहे.

 

 

 

गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुजरातमध्ये सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन करण्यात आले होते, परंतु एक महिन्यातच त्यांना उपरती झाली आहे.

 

 

डायमंड बोर्स सर्वात जगातील मोठी कार्यालयीन इमारत आहे. येथे ४,२०० हून अधिक हिरे व्यापार कार्यालये आहेत. मात्र, बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रसिद्ध हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी खुद्द आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवणार असल्याचं समोर आलं आहे.

 

 

 

सुरत डायमंड बोर्स सुरू होण्यापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिरे व्यापाराचे केंद्र मानले जात होते. परंतु SDB उघडल्यानंतर सुरत देखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र बनेल असे वाटते होते,

 

 

मात्र आता या डायमंड बोर्सला मोठा धक्का बसताना दिसत आहे. सुरत शहर आणि बोर्स यांच्यामधील अंतर व्यापाऱ्यांना सोयीचे नसून

 

 

या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचाही अभाव आहे. याशिवाय कर्मचारी स्थलांतर करण्यास तयार नसल्यामुळेही हिरे व्यापाऱ्यांची गाडी पुन्हा मुंबईकडे वळत आहेत.

 

 

 

 

किरण जेम्सचे सर्वेसर्वा वल्लभभाई लखानी यांचा सूरत डायमंड बोर्स उभे करण्यात मोठा वाटा आहे मात्र, मुंबईतील इतर व्यापाऱ्यांकडून सहकार्य लाभ नसल्यामुळे लखानी

 

 

 

 

आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील हिरे व्यापारी आपलं बस्तान सूरतला हलवण्यास तयार नसून

 

 

 

हा बोर्स सूरमधील हिरे केंद्रपासून दूर असल्याने कर्मचारी आणि मजूर देखील काम करण्यास तयार नसल्याचे देखील यामागील एक कारण मानलं जात आहे.

 

 

 

 

किरण जेम्स मुंबईतून देखील व्यवसाय सुरुच ठेवेल तर दोन दिवसांपासून सुरतहून व्यवसाय पुन्हा मुंबईला हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

 

 

सुरत डायमंड बोर्समधील किरण जेम्स सर्वात मोठी कंपनी असून गेल्या महिन्यात व्यवसाहर सुरतमध्ये शिफ्ट केल्यापासून कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला असून कंपनीच्या उत्पन्नात घट नोंदवली गेली.

 

 

 

 

दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबईतील काही व्यापारी आपला व्यवसाय सुरतला हलवणार असल्याने राज्यात राजकारण रंगले होते.

 

 

 

 

महाराष्ट्रातून व्यवसाय बाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरले. डायमंड बोर्समध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस,

 

 

 

रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सिक्योर वॉल्टच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *