राज्यसभेवर जाण्यासाठी सर्वच पक्षात अटीतटीची स्पर्धा ;निवडणूक बिनविरोध होणार?
Competition in all parties to go to the Rajya Sabha; will the election be uncontested?
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्यातील 6 जागांसाठी ही निवडणूक होणार असून यासाठी येत्या 2७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप 3,
शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
देशातील १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ६ राज्यसभा खासदारांचा देखील कार्यकाळ पूर्ण होत आहे.
यानंतर येत्या २७ तारखेला राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल देखील जाहीर केला जाईल.राज्यसभेसाठी सर्वच पक्षामध्ये रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.
राज्यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्यासह व्ही व्ही मुरलीधरन हे भाजपचे खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई तर काँग्रेसचे कुमार केतकर
आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हान याचा कार्यकाळ संपत आला आहे. याजागी आता कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून राज्यसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. १३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे,
तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य ३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत.
ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश,
तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.