नागपूर ते मडगांव प्रतिक्षा एक्स्प्रेस आता दररोज धावणार

Nagpur to Madgaon Pratiksha Express will now run daily ​

 

 

 

 

खान्देश व विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी दैनिक व नियमित नागपूर मडगाव गोवा (शिर्डी मार्गे) प्रतिक्षा एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी

 

 

 

श्री.वैभव मनोज बहुतूले राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना,शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस-सल्लागार यांनी रेल्वे प्रशासन व मंत्रालयाकडे सतत लाऊन धरली होती.

 

 

 

सदर गाडी ही आठवड्यातून केवळ दोनदाच धावत होती. सुरुवातीला हि गाडी प्रायोगिक तत्वावर चालविण्यात आली. परंतु या गाडीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद बघता दोन ते तीन महिन्याकरिता वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती.

 

 

विदर्भ खान्देश व कोकण प्रांतात प्रवाशी व मालवाहतुकीच्या दृष्टीने दळणवळणासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे ही गाडी दररोज व नियमित चालविण्यात यावी याकरिता प्रवाशांकडून वारंवार मागणी होत होती.

 

 

यासाठी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण-सावंतवाडी (रजि) यांनी प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री),

 

 

नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते वाहतूक ,सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री), रेल्वे बोर्ड अध्यक्ष, नवी दिल्ली,संयुक्त निर्देशक, कोचिंग रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,.उप निर्देशक कोचिंग रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे वारंवार ही मागणी लाऊन धरली होती.

 

 

 

 

जन शिकायत कार्यालय मुंबई, रावसाहेब पाटील दानवे रेल्वे राज्यमंत्री,भारतीय रेल्वे यांच्याकडे वैभव मनोज बहुतूले राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना,शेगांव यांनी केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

 

 

यासंदर्भात सदर नागपूर मडगाव गोवा प्रतिक्षा एक्स्प्रेस दररोज चालविण्या संदर्भात कृती करण्याचे आदेश जन शिकायत कार्यालयाकडून मध्य रेल्वे प्रशासनास नुकतेच मिळाले आहेत.

 

 

 

 

या गाडीमुळे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ, मोझरी,मूर्तीजापूर येथील कार्तिकस्वामी मंदिर दत्त मंदिर,शेगांव येथील गजानन महाराज मंदिर,बंकटलाल सदन,

 

 

गोमाजी महाराज मंदिर, म.गांधीजींचा सेवाग्राम आश्रम, आनंद सागर,नांदुरा येथील १०५ फुटी उभी हनुमान मुर्ती,नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन,शिर्डी संस्थान तसेच कोकणातील दापोली येथील चंडिका मंदिर,मुरुड कर्दे,

 

 

 

आंजर्ले, हेदवी, गणपतीपुळे समुद्र किनारा,कणकवली येथील भालचंद्र महाराज,देवगड येथील कुणकेश्वर,वेंगुर्ले येथील सातेरी देवी,मालवण येथील भराडी देवी इ.तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळी प्रवाशांना जाण्यास सुलभता येईल.

 

 

 

कोकणातील फळे,खेळणी व विदर्भ –खान्देशातील मिठाई,केळी व मालवाहतुकीच्या दृष्टीने व्यावसायीकानाही लाभ होईल. या गाडीचा जास्तीत जास्त लाभ प्रवाशांनी घ्यावा

 

 

असे आवाहन वैभव बहुतूले राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस यांनी केले आहे.राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव(रजि), प्रवासी संघटना शेगांवनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *