राजदचे २ आमदाराना बंधक केल्याचा आरोप
Allegations of hostage taking of Rajadache 2 Amrana

बिहारमध्ये नितीश सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकण्याआधीच राजदचे दोन आमदार चेतन आनंद आणि नीलम देवी यांच्यावर सत्ताधारी पक्षाने जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.
चेतन आनंद आणि नीलम देवी यांना बळजबरीने सत्ताधारी पक्षाच्या व्हिपच्या चेंबरमध्ये बसवण्यात आले आहे, असे आरजेडीचे ज्येष्ठ नेते शक्ती सिंह यादव यांनी सोमवारी सांगितले.
राजद नेते शक्ती सिंह यादव म्हणाले की, सत्तेत असलेल्यांनी प्रशासनाचा गैरवापर केला. रविवारी रात्री उशिरा चेतन आनंद यांना धमकावून दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजद विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतून जबरदस्तीने काढून घेण्यात आले.
राजदचे आमदार चेतन आनंद आणि नीलम देवी यांना सोमवारी धमकी दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या व्हिपच्या चेंबरमध्ये ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजप-जेडीयूचा खरा चेहरा समोर आला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी तीन आमदार विधानसभेत पोहोचले नाहीत. भाजपचे मिश्रीलाल यादव विधानसभेत पोहोचलेले नाहीत. त्याच्याशी संपर्क साधण्याचा आतापर्यंत प्रयत्न होऊ शकला नाही.
तर रश्मी वर्मा आणि जेडीयूचे आमदार डॉ.संजीव कुमार वाटेत असल्याचे सांगितले जात आहे. राजदचे आमदार चेतन आनंद यांच्याबाबतही सस्पेन्स आहे.
रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी तेजस्वी यादव यांना त्यांच्या राहत्या घरातून पाटलीपुत्र येथील घरी नेले. चेतनचा भाऊ अंशुमन याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
दुसरीकडे, आता आरजेडीने आपल्या दोन आमदार नीलम देवी आणि चेतन आनंद यांना जेडीयूचे चीफ व्हीप संजय गांधी यांच्या चेंबरमध्ये कोंडल्याचा आरोप केला आहे.
यापूर्वी जेडीयू नेते संजय झा यांनी आरजेडीवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.