चव्हाणांच्या राजीनामापत्रात पेनाने लिहिलेल्या एका शब्दामुळे सर्व काही कळले
One word penned in Chavan's resignation letter revealed everything

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा चर्चा केली आहे.
अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पत्रामध्ये याबाबतचा तपशील समोर आला आहे. त्यामध्ये अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीसोबतच काँग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्यासोबत आणखी काही नेत्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्यासोबत आणखी काही नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहे.
नांदेडमध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे. तर मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी भाजप करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांची ओळख आहे. अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात
गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यांच्यामध्ये या भेटीवेळी चर्चा झाली. ते सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत.
राहुल नार्वेकर यांचा काल रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले.
मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत.
तर, आज अशोक चव्हाण याचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. सोबत काँग्रेसचे आमदार आहेत अशी माहितीही काही माध्यमांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याची माहिती आहे.
अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत 11 आमदार असल्याची माहिती साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.