काय बोलता ! सनी लिओनी उतरली थेट पोलीस भरतीत ?
What are you talking about! Sunny Leone landed directly in police recruitment?

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण, यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण काही वेगळेच आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरतीत सनी लिओनीचं नाव आलंय. यूपी पोलीस भरती परीक्षेचं प्रवेश पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
पहिल्या शिफ्टची परीक्षा शनिवारी झाली. यापैकी एक प्रवेश पत्र कन्नौज जिल्ह्याच्या केंद्रातून व्हायरल झालंय, त्यावर सनी लिओनीचा फोटो आणि नाव आहे. यानंतर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
सनी लिओनीचे नाव आणि फोटो असलेले प्रवेश पत्र (ॲडमिट कार्ड) इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या कार्डवर अभिनेत्रीचे दोन फोटो दिसत आहेत.
ही माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर सर्वजण गोंधळून गेले. त्यानंतर केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अॅडमिट कार्डनुसार, उमेदवाराला तिर्वा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षेला बसायचं होतं.
ही उमेदवार होती सनी लिओनी. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही वेळातच अभिनेत्रीच्या नावाचे प्रवेशपत्र व्हायरल झाले. मात्र, हे प्रवेशपत्र खरे नसून कुणीतरी एडिट करून व्हायरल केल्याचंही म्हटलं जातंय.
हे बनावट प्रवेशपत्र आहे. काही उमेदवारांनी फॉर्म भरताना चुकीचा फोटो अपलोड केल्याचं सांगण्यात येत आहे. भरती मंडळाला ही माहिती मिळाल्यावर
त्यांनी संबंधित उमेदवारांना सांगितलं की ज्यांचा फोटो चुकीचा छापला गेला असेल त्यांनी परीक्षा देण्यासाठी त्यांच्या ओळखपत्रासह केंद्रावर पोहोचावं.
सनी लिओनीचे प्रवेशपत्र व्हायरल झाल्याबद्दल एसपींनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाबाबत त्यांच्या बाजूने सांगण्यात आलंय की अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराने आपले नाव व फोटो अपलोड केलेला नाही.
त्यामुळे हे कोणीतरी जाणीवपूर्वक केलंय. संबंधित उमेदवारांना दुसरे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासंबंधात उत्तर प्रदेश रिक्रूटमेंट अँड प्रमोशन बोर्ड, लखनऊ यांना माहिती देण्यात आली आहे.
शरारती तत्वों के दिमाग़ की करतूत। पुलिस की भर्ती परीक्षा में कन्नौज के सेंटर पर सनी लियोन को दिखा दिया परीक्षार्थी। pic.twitter.com/yOuXn7VLjg
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) February 17, 2024