हवामान विभागाकडून 36 तासांचा अलर्ट;समुद्रात उसळणार मोठ्या उंच लाटा,
36 hours alert from Meteorological department; big high waves will bounce in the sea,
मुंबई, केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत समुद्रात उंच लाटा उसळणार आहे. या लाटा 0.5 मीटर ते 1.5 मीटर उंच असणार आहे.
यामुळे 4 मे पासून रात्री 2.30 वाजेपासून 5 मेपर्यंत रात्री 11.30 वाजेपर्यंत अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.
मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तब्बल 36 तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
समुद्रात ज्या प्रकारे लाटा उठण्याचा अंदाज वर्तवला जातो त्याला कलक्कडल म्हणतात. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ने एक इशारा दिला आहे.
INCOIS देशभरातील मच्छिमारांना अलर्ट जारी करते. INCOIS ने केरळ आणि दक्षिण तामिळनाडूमधील मच्छिमारांना त्यांच्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले आहे.
मुंबईत दोन दिवस ऊकाड्याचे असणार आहे. शनिवार रविवार तापमान वाढणार आहे. मुंबईच्या हवेत शनिवार आणि रविवार आर्द्रता अधिक प्रमाणात असेल.
त्यामुळे उकाड्याची झळ बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई तसेच उपनगरात शनिवार, रविवारी कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान असणार आहे.
किनारपट्टीसह सोलापूर, बीड, लातूर आणि उस्मानाबादला शनिवार, रविवारसाठी “यलो अटॅलर्ट’ देण्यात आला आहे. किनारपट्टीवर
उष्णतेसह दमट वातावरण, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट किंवा उष्णतेच्या लाटसद्दश स्थितीचा अंदाज आहे.
यंदा मॉन्सून दरम्यान 22 वेळा हाईटाइड येण्याचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान हायटाईडचा धोका
मुंबईतील समुद्रात असणार आहे. यामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचणार आहे. पावसासोबत हायटाईड आल्यानंतर हा धोका निर्माण होतो.