“या” नऊ जागेवरून महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागावाटप रखडले

Lok Sabha seat allocation of Mahavikas Aghadi stalled from "these" nine seats

 

 

 

 

 

 

 

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेससह मित्र पक्षांचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही.

 

 

 

महाविकास आघाडीत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३९ जागांवर एकमत झालेलं असून ९ जागांचा तिढा अद्याप सुटलेला
महाविकास आघाडीच्या बैठका,

 

 

दावे प्रतिदावे यानंतर देखील अजूनही लोकसभेच्या ९ जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झालेलं नाही. वंचित बहुजन आघाडी देखील महाविकास आघाडीत दाखल झालेली आहे.

 

 

 

ज्या ९ लोकसभा मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही त्यामध्ये नाशिक, कोल्हापूर, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, पुणे, कोल्हापूर, वर्धा, भंडारा गोंदिया आणि हिंगोली मतदारसंघाचा समावेश आहे.

 

 

 

मुंबई दक्षिण मध्य जागेवर गेल्यावेळी शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाले होते. आता ही जागा शिवसेना ठाकरे गटाला हवी आहे. या जागेवर काँग्रेसचा देखील दावा आहे.

 

 

राहुल शेवाळेंनी शिंदेंना साथ दिल्यानं ठाकरे त्यांना पराभूत करण्यासाठी ताकदीनं या मतदारसंघात उतरु शकतात. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यापूर्वी या मतदारसंघातून निवडणूक लढल्या होत्या.

 

 

 

मुंबई उत्तर पश्चिम मध्ये गजानन कीर्तिकर खासदार असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. ठाकरेंकडून या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना संधी दिली जाऊ शकते.

 

 

गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं ही जागा लढवली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव झाला होता. या ठिकाणी देखील दोघांना दावा केला आहे.

 

 

अकोला लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा देखील कायम आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे येथून विजयी झाले होते.

 

 

 

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत मतविभाजन झाल्यानं भाजपला फायदा झाला होता. या मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही आहे.

 

 

 

हिंगोली लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी झाले होते. ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

 

 

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं या जागेवर दावा केला आहे. सुभाष वानखेडेंसारखा तगडा उमेदवार ठाकरेंकडे आहे.

 

 

 

भंडारा गोंदियाची जागा गेल्यावेळी राष्ट्रवादीकडे होती. नाना पटोले यांनी २०१४ ला प्रफुल पटेल यांचा पराभव केला होता. नाना पटोले यांना काँग्रेसकडे हा मतदारसंघ असावा,

 

 

 

असं वाटत आहे. तर, पक्ष नाना पटोले यांना उमेदवारी देऊ शकतो. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा देखील दावा आहे.

 

 

 

 

पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा वर्षभरापासून रिक्त आहे. ही जागा काँग्रेसकडून लढवली जाते. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसला यश आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला देखील या जागेवर उमेदवार द्यायचा आहे.

 

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचा दावा आहे. या मतदारसंघात तिघांची ताकद आहे.

 

 

कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. तीन पैकी कोणत्या पक्षाच्या चिन्हावर ते लढणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

 

 

 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून हेमंत गोडसे विजयी झाले होते. आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. या मतदारसंघात देखील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रस्सीखेच सुरु आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *