मराठा आरक्षण;३ मार्चला संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन

Maratha Reservation; March 3 road stop movement across the state in every district

 

 

 

 

 

सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सगेसोयरेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी जरांगें पाटील यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

 

 

यावर अंमलबजावणी झाली नाही तर २४ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात पुन्हा मराठा आंदोलन तिव्र करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.

 

 

 

तशा सूचना देखील मराठा कार्यकर्त्यांना केल्या आहेत.राज्य सरकारने मंगळवारी (२० फेब्रुवारी) विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण

 

 

आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे मात्र सगेसोयरे आणि ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

 

 

 

 

मराठा आंदोलनाचे पोलिसांना दिलेले निवेदन कायम स्वरूपी असावं. मराठा समाजाने आंदोलन करताना आपल्या गावात करावं. स्वतःच्या हट्टसाठी हे आंदोलन करायचं नाही तर सरकारला जेरीस आणण्यासाठी करायचं आहे.

 

 

 

महाराष्ट्र भर आदर्श रस्ता रोको झाला पाहिजे. वावर आपलं आहे, त्यातून रस्ता गेला असेल तर रास्ता रोको करायचा. सकाळी १०.३० वाजता आंदोलन सुरू होईल १ ते १.३० पर्यंत चालेल. मात्र पोलिसांची नोटीस आली तरी घाबरायंच नाही,

 

 

परवानगी नाही दिली तरी आंदोलन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. ३ मार्चला संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात एकच रस्ता रोको आंदोलन होईल.

 

 

जगातला सर्वात मोठा रस्ता रोको झाला पाहिजे, गिनीज बुकने यांची नोंद घेतली पाहिजे असं आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

 

 

हे शेवटच आंदोलन असणार आहे. कुणाची गाडी फोडायची नाही तोडायची नाही. पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर सर्व गावांनी पोलीस ठाण्यात जाऊन बसायचं. पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचा नाही, असंही ते म्हणाले आहेत.

 

 

 

 

दरम्यान मराठा समाजाकडून कडून पुन्हा गाव बंदी आणि निवडणुकावर बहिष्कार टाकण्याची मागणी, जरांगें पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

 

 

तसेच आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत मराठा समाजात आणि आंदोलकात चर्चा. आंदोलन करायचं आहेचं. तसंच तहसीलदार कार्यालयात जाऊन आपल्या नोंदी आपण शोधा. सगर्व मराठा समाजाने कुणबी नोंदींसाठी अर्ज करा, असं आवाहन मनोज जरांगें यांनी केलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *