मनोज जरांगेंचे फडणवीसांवर ५ गंभीर आरोप

Manoj Jarang makes 5 serious allegations against Fadnavis ​

 

 

 

 

 

आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी बैठक घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

 

 

मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत. त्याचबरोबर जरांगे यांनी फडणवीसांवर आरोप करत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 

 

 

१) देवेंद्र फडणवीसचे षडयंत्र आहे. या लोकांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माणसं असून, अजित पवारांचे दोन आमदार आहेत.

 

 

 

तुला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो. अजय बारसकरला देखील फडणवीसांनी उभा केला आहे. मीडियावर दबाव टाकण्यात आले. यात काही समनव्यक सुद्धा आहेत. मला बदनाम करण्यासाठी मुंबईत प्रेस घेतील.

 

 

२) सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, आम्ही ओबीसीमधून आरक्षण मागत आहोत, जे मराठा आणि कुणबी एक असल्याचं देखील सिध्द झालं आहे,

 

 

 

त्यांनीच सांगितलं सरसकट मिळणार नाही म्हणून सगेसोयरे शह्द दिला हे सर्ल एकटे देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा आरोप जरांगेंनी केला आहे.

 

 

 

 

 

३) मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. 10 टक्के आरक्षण लादले आहे दडपशाही होते आहे. फडणवीसांना माझा बळी हवा आहे,

 

 

 

मी सागर बंगल्यावर येण्यासाठी तयार आहे, मी येतो माझा बळी घे. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्या विरोधात तक्रारी शोधल्या जात आहेत, असा आरोपही जरांगेंनी केला आहे.

 

 

 

 

४) सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता. देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्या पण, खोटे आरोप करू नका तुम्हाला आयुष्यातून उठवेन असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

 

 

 

५) कधीच अजित पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत, पण, जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणत ते तिकडे गेले, छगन भुजबळ देखील शरद पवारांना कधी सोडू शकत नाहीत,

 

 

 

त्यांचं आणि अजित पवारांचं जमत नाही पण, देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकतील म्हणून अजित पवारांसोबत पटत नसून छगन भुजबळांना भाजपसोबत जावं लागलं असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

एकनाथ शिंदे देखील कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत, पण नाईलाजाने त्यांना माघारी जावं लागलं, तर अशोक चव्हाणांच्या घरी ३ वेळा मुख्यमंत्री पद दिलं ते देखील कधीच काँग्रेस सोडू शकत नाहीत मात्र, त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावं लागलं असंही जरांगे म्हणालेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *