अजितदादांच्या उमेदवाराचा फडणवीसांना इशारा ;माफी मागा अन्यथा विरोधात कोर्टात जाणार

Ajitdad's candidate warns Fadnavis; Apologize or go to court against him

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे. असं असतानाच मलिकांनी थेट फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

 

कुणी कितीही मोठं असू द्या किंवा छोटी असू द्या. देवेंद्रजी पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जर या लोकांनी माफी मागितले नाही.

 

तर मी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. सिव्हिल आणि डिफेन्सेस केस टाकणार आहे, असा इशाराच नवाब मलिक यांनी दिला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा नबाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही मागणारही नाही. मागणारा नवाब नाही, आम्ही देणारे आहोत.

 

पण नाही देवेंद्रजीला बोलत असताना माझ्या बाबतीत त्यांच्या काय असतील. नबाब मलिक कोणाला घाबरत नाही. आता आम्ही बोलायला सुरुवात केली तर कोर्टात जाताय की यांची जामीन रद्द करा.

 

मला तुरुंगात टाका. आणखीन मला दहा- वीस हजार मत वाढतीलय माझ्या बाबतीत जे गैरसमज निर्माण करतात. दाऊदशी माझं नाव जोडतात.

 

काही लोक आतंकवादी बोलतोय काही लोक देशद्रोही बोलतायेत. या सगळ्यांच्या विरोधात मी तपासून नोटीस पाठवणार आहे. सगळ्यांवर क्रिमिनल केस टाकणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.

 

जेव्हा भाजपचे प्रचार करतायेत. तेव्हा भाजपचे प्रचारक या नात्याने तेव्हा प्रचार करतात. आम्ही कोणाला कोणाचाही पाठिंबा मागत नाही. उलट मी त्यांना आज आव्हान करतो.

 

भाजपवाल्यांनो, ताकात लावून बघा… तुमची हिंमत असेल तर माझी जागा पाडून दाखवा. मी फटिचर माणूस आहे. कोणीही माझ्या नादी लागू नका, असा इशारा मलिकांनी दिला आहे.

 

योगी आदित्यनाथ यांनी ‘बेटेंगे तो कटेंगे’ असं विधान प्रचारसभेदरम्यान केलं. यावर नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे, माझे विचार भाजपला जोडणार नाही.

 

‘बेटेंगे तो कटेंगे’ असं म्हणत आहेत. हे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. इतके घाणेरडा राजकारण होईल. तितक्याच खोलात ते जात राहतील, असं नवाब मलिक म्हणालेत.

 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक आणि भाजपमधील वाद लपून राहिलेला नाही. नवाब मलिक यांना उमेदवारी दिली जाऊ नये,

 

यासाठी भाजपने अजित पवारांना वारंवार सांगितलं. पण अजितदादांनी मलिकांना उमेदवारी दिली. मुस्लिमबहुल मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अबू आझमी तीन वेळा निवडून आलेले आहेत.

 

त्यांच्या विरोधात मलिक लढत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने सुरेश कृष्ण पाटील यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *