3 राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर;पाहा कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?

Rajya Sabha election results in 3 states announced; see which party won how many seats?

 

 

 

 

 

राज्यसभा निवडणुकीसाठी 3 राज्यांतील 15 जागांवर आज मतदान झाले. ही तीन राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक. उत्तर प्रदेशातील 10, कर्नाटकातील 4 आणि

 

 

 

हिमाचल प्रदेशातील एका जागेवर मतदान झाले. उत्तर प्रदेशमध्ये सपाला मोठा फटका बसला आहे. येथे सपाच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केले.

 

 

 

15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागा रिक्त आहेत. यापैकी 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान झाले आहे.

 

 

 

यापैकी भाजपने 8 जागा जिंकल्या आणि यूपीमध्ये सपाला दोन जागा मिळाल्या. कर्नाटकातील तीनही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या. तर हिमाचलमध्ये बहुमत असूनही काँग्रेसने एक जागा गमावली आणि भाजप जिंकला.

 

 

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 रिक्त जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने आपला आठवा उमेदवार उभा केला आणि सपा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे तो विजयी झाला.

 

 

 

 

10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. यापूर्वी 10 जागांसाठी केवळ 10 उमेदवार होते. भाजपचे 7 आणि समाजवादी पक्षाचे 3.

 

 

 

या दहा जणांचा विजयही जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र क्रॉस व्होटिंगमुळे सपाचा खेळ बिघडला आणि भाजपच्या आठव्या उमेदवाराला विजय मिळाला.

 

 

 

भाजपने 8 तर सपाने दोन जागा जिंकल्या आहेत. सपा उमेदवार जया बच्चन यांना सर्वाधिक 41 मते मिळाली आहेत. क्रॉस व्होटिंगचा स्पष्ट फायदा भाजपला मिळाला आणि त्यांचा आठवा उमेदवारही विजयी झाला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *