मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा;अजितदादांची अमितशहाकडे मागणी ?
Expand the cabinet quickly; Ajitdad's demand to Amit Shah

महाराष्ट्रात येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत ‘एनडीए’ला लक्षणीय यश अपेक्षित असेल,
तर लवकरात लवकर कामाला लागणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांची भेट घेतली. राज्यात सत्तावाटप योग्य प्रकारे झाले, तरच निवडणुकीत यश मिळेल असेही या तिघांनी शहा यांना सांगितल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा, हा राष्ट्रवादीचा सुरुवातीपासून आग्रह आहे. आता निदान महामंडळांवरील नेमणुका मार्गी लावा, अशी विनंती या भेटीदरम्यान करण्यात आल्याचेही समजते.
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. त्या समाजाकडे दुर्लक्ष होऊ नये, याकडेही लक्ष द्या, असेही या नेत्यांनी सांगितल्याचे समजते.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रात लक्ष घालण्याचे आश्वासन शहा यांनी दिल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.