भाजपच्या डझनभर खासदारांचा पत्ता कट?पाहा कोणाकोणाचा नंबर?

Dozens of BJP MPs' addresses hacked? See whose number?

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण भाजपला अद्याप तरी महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवला आलेला नाही.

 

 

भाजप ३२ ते ३७ जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. पण पक्ष नेतृत्त्वाकडून करण्यात आलेल्या ३ अंतर्गत सर्व्हेंमुळे आता विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे.

 

 

 

 

मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या यशाचं विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्द सातत्यानं वापरला. निवडणुकीत आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम होता,

 

 

 

असं फडणवीस वारंवार सांगत होते. लोकसभेला उमेदवारी देताना आता भाजप खासदारांचा स्ट्राईक रेटच बघणार आहे. ज्या खासदारांचा स्ट्राईक रेट कमी त्यांची तिकिटं कापली जातील.

 

 

 

भाजप नेतृत्त्वाकडून ३ अंतर्गत सर्व्हे करण्यात आले. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार भाजपचे डझनभर खासदार डेंजर झोनमध्ये आहेत.

 

 

 

भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देताना ४ निकष आखले आहेत. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदारांबद्दल असलेली नाराजी,

 

 

 

 

निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आल्यानं काहींच्या तिकिटाबद्दल असलेले आक्षेप अशा ४ प्रमुख निकषांच्या आधारे तिकीट वाटपाचे निर्णय घेतले जातील.

 

 

भाजप नेतृत्त्वाकडून करण्यात आलेल्या ३ अंतर्गत सर्व्हेनुसार डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे.

 

 

पाच वर्षांतील कामाचा कामगिरीचा आढावा घेऊन भाजपनं खासदारांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं आहे. जनमानसात चांगली प्रतिमा नसणाऱ्या, लोकसंपर्क नसलेल्या खासदारांना डच्चू दिला जाऊ शकतो.

 

 

 

कोणकोणत्या खासदारांचा स्ट्राईक रेट कमी?
१. बीड- प्रीतम मुंडे
२. धुळे- सुभाष भामरे
३. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी
४. सांगली- संजय काका पाटील
५. लातूर- सुधाकर श्रृंगारे
६. जळगाव- उन्मेष पाटील
७. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी
८. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन
९. अहमदनगर- सुजय विखे पाटील
१०. नांदेड- प्रतापराव चिखलीकर
११. वर्धा- रामदास तडस
१२. रावेर- रक्षा खडसे

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *