अजित पवार गटाला फक्त चार जागा ?
Ajit Pawar group only four seats?
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपा संबंधित चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरुच आहे.
गेले दोन दिवस दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक झाली. मात्र, अद्याप महायुतीचं जागावाटपावर एकमत आहे.
त्यातच शिंदेंना दोन अंकी जागा आणि अजित पवारांना एक अंकी जागा मिळणार असल्याची माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,
अजित पवार गटाला फक्त चार जागांवर समाधानं मानावं लागण्याची शक्यता आहे. कारण, भाजप राष्ट्रवादी गटाचा फक्त चार जागा सोडण्याच्या विचारात आहे. इतर जागा शिंदे गट आणि भाजप वाटून घेतील, अशी माहिती आहे.
अजित पवार गटाला अवघ्या चार जागा देण्यावर भाजप ठाम असल्याची मोठी माहिती सध्या सुत्रांकडून समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी चारपेक्षा जास्त जागा सोडण्यास भाजपचा नकार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
बारामती, रायगड ,परभणी या जागा राष्ट्रवादीला जाणं निश्चित असल्याचं समजत आहे. दोन जागांबाबत दोन दिवसांनंतर होणाऱ्या
महायुतीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला राज्यांतील घटक पक्षांचे प्रमुख आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत अद्याप अंतिम तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये दोन दिवसानंतर महायुतीची पुन्हा एक बैठक पार पडणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पार पडणाऱ्या या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा चांगल्या प्रकारे सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
अमित शाह यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागावाटपाबाबत रात्री १ वाजेपर्यंत बैठक सुरू होती.
बैठकीत महायुतीच्या महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी दोन आकडी , अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस साठी एक आकडी तर उर्वरित जागा भारतीय जनता पक्ष लढेल अशी चर्चा अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत झाल्याचे कळतंय.