शिंदे,अजितदादा बॅकफूटवर; डबल गेम होण्याची भीती

Shinde, Ajitdada on the backfoot; Fear of double game

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतरही महायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे.

 

 

 

भारतीय जनता पक्ष राज्यात ३२ किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं ३५ जागांसाठी उमेदवारांची यादी तयारी ठेवली आहे. त्यामुळे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सुरुवातीला २३ जागांची मागणी केली. हळूहळू हा आकडा १८ पर्यंत आला. पण अमित शहांनी सेनेला १० पेक्षा अधिक सोडण्याची तयारी नसल्याचं सांगितलं.

 

 

 

 

यानंतर शिंदेंनी माझ्या सोबत असलेल्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, अशी विनंती केली. शिंदेंना १० पेक्षा अधिक जागा देण्याचा भाजपचा मानस नाही.

 

 

 

 

अजित पवारांनाही ४ ते ६ जागा दिल्या जाऊ शकतात. भाजप फारच मोठा भाऊ होऊ लागल्यानं दोन्ही मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे.

 

 

 

 

लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणांचा हवाला भाजपकडून मित्रपक्षांना देण्यात आला. उदाहरणार्थ, यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी,

 

 

 

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह अनेक खासदार डेंजर झोनमध्ये आहेत. त्यांच्या पराभवाची शक्यता अधिक आहे.

 

 

 

 

हे सगळे खासदार शिंदे गटाचे आहेत. शिंदेंची शिवसेना काही मतदारसंघांमध्ये फारशी सक्षम नसल्याचं भाजपला वाटतं.

 

 

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांना लोकसभेत एकही जागा मिळू देऊ नये. बारामतीतही त्यांचा पराभव करावा, अशी भाजप नेतृत्त्वाची इच्छा आहे.

 

 

 

पण भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादीला देण्यात आलेली जागांची ऑफर अतिशय कमी आहे. लोकसभेला कमी जागा मिळाल्यास तितके कमी खासदार निवडून येणार.

 

 

 

त्याचा परिणाम पुढे विधानसभा निवडणुकीत दिसणार. कमी विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी असल्याचं सांगत भाजप विधानसभेवेळी कमी जागांची ऑफर देणार, अशी भीती दोन्ही मित्रपक्षांना आहे.

 

 

 

दरम्यान जागावाटपाचं सूत्र अद्याप ठरलेलं नाही. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या घडामोडी पाहता यंदाची लोकसभा निवडणूक सर्वार्थानं वैशिष्ट्यपूर्ण असेल.

 

 

 

टाईम्स नाऊ ईटीजीनं लोकसभा निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर सर्व्हे केला. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज यातून वर्तवण्यात आला.

 

 

 

 

त्यानुसार महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळतील. महायुतीला ३५ पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे.

 

 

 

पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक नुकसान होईल असा कयास आहे. काँग्रेसची कामगिरीदेखील खराब होईल अशी शक्यता आहे.

 

 

 

सर्व्हेतील आकडेवारीनुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळू शकतात. राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला ४८ पैकी २७ ते ३१ जागा मिळतील असा अंदाज आहे.

 

 

 

 

याचा अर्थ भाजपच्या ४ ते ८ जागा वाढू शकतात. शिंदेंच्या शिवसेनेला ४ ते ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. सध्या त्यांच्यासोबत १३ खासदार आहेत.

 

 

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ ते ३ जागांवर यश मिळू शकतं. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत लोकसभेचा एकमेव खासदार आहे.

 

 

 

विरोधातील महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिवसेना (उबाठा) गटाला मिळतील. त्यांना ७ ते ९ जागांवर यश मिळू शकतं.

 

 

 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १ ते ३ आणि काँग्रेसला ० ते १ जागा मिळू शकतात. तर अन्य पक्षांना ० ते १ जागेवर यश मिळण्याचा अंदाज आहे.

 

 

 

याचा अर्थ ठाकरेंच्या जागा वाढू शकतात. सध्या त्यांच्यासोबत केवळ ५ खासदार आहेत. ती संख्या २ ते ४ नं वाढू शकते.

 

 

सर्व्हेतील आकडेवारी पाहता भाजपला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. सध्या एकमेव लोकसभा खासदार सोबत असलेल्या अजित पवारांना १ ते ३ जागांवर यश मिळू शकतं.

 

 

 

याचा अर्थ महायुतीचा फायदा अजित पवारांना होईल. तर एकनाथ शिंदेंना सर्वाधिक नुकसान होईल. सध्या १३ खासदार सोबत असलेल्या शिंदेंचे केवळ ४ ते ६ उमेदवार विजयी होऊ शकतात.

 

 

 

याचा अर्थ त्यांच्या खासदारांची संख्या ७ ते ९ नं कमी होऊ शकते. विशेष म्हणजे ठाकरेंची शिवसेना शिंदेंपेक्षा अधिक जागा जिंकू शकते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *