अजित दादा बीडला पण धनंजय मुंडेंची दांडी ,काय घडले कारण ?

Ajit Dada lost to Beed but Dhananjay Munde's stick, what happened because?

 

 

 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं. याप्रकरणावर धनंजय मुंडे यांच्यावर टीका झाली होती.

 

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंडे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

 

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा असताना धनंजय मुंडे गैरहजर राहीले. आपण आजारी असल्याचे कारण त्यांनी यावेळी दिले. पण धनंजय मुंडे यांनी मंगळवारी रात्री मुंबईत फॅशन शोला उपस्थिती लावली होती.

 

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे विविन फॅशन शो मंगळवारी रात्री पार पडला. मुलीच्या फॅशन शो असल्यानं कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे कार्यक्रमाला हजर होते. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं.

 

पण सकाळी त्यांनी आपण आजारी असल्याचं सोशल मीडियात जाहीर केलं होतं. अजितदादा बीड दौ-यावर असताना धनंजय मुंडे मुंबईत दिसले. यावरुन राजकारणात विविध चर्चा सुरु आहेत.

 

 

अजितदादा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीच्या चर्चा सुरु झाल्यात. गेले काही दिवस पक्षात एकटं पाडल्याच्या कारणावरुन धनंजय मुंडे नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. आज अजित पवार बीडमध्ये असताना धनंजय मुंडे मात्र मुंबईत होते.

 

 

धनंजय मुंडेंनी एकीकडं समाजमाध्यमावर आपण आजारी असल्याचं सांगत दौऱ्यात दांडी मारल्याचं सांगितलं. मात्र दुसरीकडं धनंजय मुंडे हे मुंबईत फॅशन शोमध्ये उपस्थित होते.

 

अर्थात वडील म्हणून मुलीच्या कौतुकासाठी फॅशन शोला उपस्थित असले तरीसुद्धा राजकीय वर्तुळात त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा जोरदारपणे सुरु आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *