मुख्यमंत्री शिंदे झाले भाजपचे स्टार प्रचारक

Chief Minister Shinde became BJP's star campaigner

 

 

 

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगण या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

 

 

 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेना हा सर्वात मोठा व जुना घटक पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

 

 

चार राज्यांतील निवडणूक प्रचारात स्वत: मुख्यमंत्री शिंदे व इतर नेते सामील होणार आहेत. पाठिंबा देण्याबाबतचे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना देण्यात आले असल्याचे शेवाळे यांनी नमूद केले.

 

 

 

राजस्थान विधानसभेत लाल डायरी झळकविणारे राजेंद्र गुढा यांना शिवसेनेने उदयपूरवाटीतून उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांनी येथील

 

 

भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. याबाबत विचारले असता दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत मार्ग काढतील, असे शेवाळे म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *