लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला पोलिसांनी केली अटक

An engineer who absconded with a bribe of one crore was arrested by the police

 

 

 

 

एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक करण्यात आली आहे. अहमदनगर येथील एक कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेला

 

 

 

औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. गणेश वाघ असे या आरोपीचे नाव आहे.

 

 

 

 

गणेश वाघ याला पकडण्यात अखेर लाच लुचपत विभागाला यश आलं आहे. लाच लुचपत विभागाच्या पथकानं वाघ याला अटक करून कोर्टासमोर हजर केलं असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. मागील बारा दिवसांपासून गणेश वाघ फरार होता.

 

 

 

लाच लुचपत विभागाच्या पथकाने वाघ याला अटक करून कोर्टासमोर हजर केले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

 

मागील बारा दिवसांपासून शोधावर असलेल्या पथकाला गणेश वाघ याला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना अटक करण्यात यश आले.

 

 

 

वाघ याला दुपारी जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या नायायल्यात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

नगरमध्ये एका सरकारी अधिका-याला तब्बल 1 कोटींची लाच स्वीकारताना रंगेहात अटक झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाडला लाच घेताना बेड्या ठोकल्यात.

 

 

 

विशेष म्हणजे हा सहाय्यक अभियंता आपल्या बॉससाठी लाच घ्यायला आला होता. तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्यासाठी लाच घेताना अमित किशोर गायकवाड फसला.

 

 

 

मुळा धरण ते देहरेदरम्यान लोखंडी पाईपलाईन टाकण्यासाठी 36 कोटींचं काम काढण्यात आलं होतं. त्यापैकी 2 कोटी 66 लाख रुपयांची बिलं ठेकेदाराला अदा करणं बाकी होतं.

 

 

 

बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी सहाय्यक अभियंता गणेश वाघने तब्बल 1 कोटींची लाच मागितली. लाच स्वीकारण्यासाठी गणेश वाघने आपला सहाय्यक अमित किशोर गायकवाडला पाठवलं.

 

 

 

ठेकेदाराकडून रोकड घेऊन जात असताना गायकवाडला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं. मुख्य आरोपी गणेश वाघचा शोध सुरु होता.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *