लोकसभेची उमेदवारी न मिळालेल्या भाजप खासदारांवर वॉरंट जारी

Warrants issued against BJP MPs who did not get Lok Sabha nomination

 

 

 

 

महाराष्ट्रातील मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

 

 

 

भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूरच्या विरुद्ध विशेष कोर्टाने जामीन पात्र अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टात आज सुनावणी दरम्यान प्रज्ञा ठाकूर प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर होत्या त्यावरून कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते.

 

 

 

प्रज्ञा ठाकूर यांच्या वकीलाकडून प्रकृती ठीक नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र कोर्टाने मंजूर केले नाही. कोर्टाने प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

 

 

 

काही दिवसांपूर्वी भाजपने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यात १९५ उमेदवारांचा समावेश होता. या यादीत भाजपने भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर ऐवजी आलोक शर्मा यांना उमेदवारी दिली होती.

 

 

 

महाराष्ट्रातील मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मोटरसायकलवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन ६ जण ठार झाले होते तर १००हून अधिक जण जखमी झाले होते.

 

 

 

 

 

२०११ साली या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला होता. त्याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाद्वारे याची चौकशी सुरू होती.

 

 

मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ साली प्रज्ञा ठाकूरला जामीन मंजूर केली होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या खटल्यात ३२३ साक्षीदार होते ज्यापैकी ३४ जणांनी साक्ष बदलली.

 

 

 

 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकूर आरोपी असून या प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीत न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश देऊन देखील त्या उपस्थित नव्हत्या.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *