ठाकरेंना पुन्हा धक्का; एक आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
Thackeray shocked again; An MLA joins the Shinde group

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री ९ वाजता त्यांचा पक्षप्रवेश झाला.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, मी मागच्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करत आलेलो आहे. तीनवेळा आमदार आणि अनेकदा नगरसेवक झालेलो आहे.
आरेमधील ४५ किलोमीटरचे रस्ते होणं गरजेचं आहे. त्यासाठी १७३ कोटी रुपये पाहिजे आहेत. काही ठिकाणी पाण्याची सोय नाहीये.
त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ते घेतले नाहीत तर लोक नाराज होतील. सत्तेमध्ये असल्यानंतरच हे कामं मार्गी लागतील.
वायकर पुढे म्हणाले, देशामध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वेगवेगळे निर्णय घेत आहेत.
माझे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांसमोर जावू शकत नाही. त्यामुळे मी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी जो विचार दिला तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
वायकर यांनी जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मला सांगितलेले आहेत. ते सोडवण्याचा सरकार म्हणून मी प्रयत्न करणार आहे.
शिंदे पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात भारताचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत.
वायकर यांनी त्यामुळे शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. वायकर यांचे काम केवळ मतदारसंघापुरतं नाहीये. संपूर्ण मुंबईसाठी वायकरांचं मोठं काम आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याचं मी स्वागत करतो.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर पुराव्यासह भ्रष्टाचाऱ्याचे आरोप केले. यातील काही नेते पुढे भाजपमध्ये, मित्रपक्षात आले.
यानंतर सोमय्या यांची गोची झाल्याचे चित्र दिसून आले. आमदार रविंद्र वायकर यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकरयांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि रविंद्र वायकर यांची पत्नी यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान रविंद्र वायकरांनी
भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात प्रवेश केला. यावर सोमय्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर काय म्हणाले सोमय्या? सविस्तर जाणून घेऊया.
उद्धव ठाकरे यांचा फायनान्स पार्टनर रविंद्र वायकर याने त्यांची साथ सोडली आहे.उद्धव ठाकरे यांची जी अवस्था झाली ते पाहून वाईट वाटतंय, अशी खोचक टीका त्यांनी केली.
गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराचे टेरेरिझम सुरू होत ते आम्ही संपवलं आहे. कोणी कुठेही आला असेल तरी राज्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही.किरीट सोमय्या यांचे काम असेच सुरू राहणार, असे ते म्हणाले.
ज्यांच्यावर मी आरोप केले अशा विविध पक्षांतील 2 डझन नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्या त्या तपास यंत्रणानी तपास कसा पुढे न्यायचा हा त्यांचा भाग आहे, असे सोमय्यांनी सांगितले.
वायकर असो किंवा आणखी कुणी असो. मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दिले त्यामुळे ही उद्धव ठाकरेंची दहशत संपवली आहे. माझी लढाई अशीच सुरू राहणार असल्याचे सोमय्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
मोदींच्या गॅरंटीचे राज्यात पालन होणार आहे. यापुढे कुणीही भ्रष्टाचार केला तरी त्याला माफ केले जाणार नाही. अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत.
आता न्यायालयाने काय करायचे? हा त्यांचा प्रश्न आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे..माझ्याकडे कोणतेही पद नाही, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्यासाठी शरद पवार एवढं बोलत आहेत. कर्ज कोणी मिळवले आणि ते कर्ज कुठे फिरवले हे देखील पवार साहेब सांगा ना?
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच याचमुळे रोहित पवार यांच्या कारखान्यावर जप्ती आलेली असल्याचे सोमय्या म्हणाले.