भाजपने शिंदेकडे दिली थेट उमेदवारांची यादीच ;कोणत्या उमेदवाराला ठेवा कोणाला बदला ;आता शिंदेंची मोठी अडचण

BJP directly gave the list of candidates to Shinde; which candidate to keep and who to replace; now Shinde's big problem

 

 

 

 

 

जागावाटपाचा पेच कायम असताना, भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले आहेत.

 

 

 

 

लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्त्वाकडून शिंदेंकडे करण्यात आली आहे. याबद्दल एकनाथ शिंदेंचं मत प्रतिकूल असल्याचं समजतं. पण भाजपकडून शिवसेनेवर दबाव वाढला आहे.

 

 

 

 

ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी भाजपनं एकनाथ शिंदेंना उमेदवारांची नावं सुचवली आहेत. ठाण्यातून संजीव नाईक, नाशिकमधून शांतीगिरी महाराज,

 

 

 

 

कोल्हापूरातून समरजीत घाटगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकणंगलेतून विनय कोरेंना उमेदवारी द्या, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या मागणीबद्दल शिंदे फारसे अनुकूल नसल्याचं कळतं.

 

 

 

 

हेमंत गोडसे नाशिकचे, संजय मंडलिक कोल्हापूरचे, धैर्यशील माने हातकणंगलेचे खासदार आहेत. तिन्ही खासदार शिंदेंसोबत आहेत. पण भाजपनं सर्वेक्षणांचा हवाला देत या जागा निवडून येणं अवघड असल्याची माहिती शिंदेंना दिली

 

 

 

 

 

आहे. या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजपनं केली. भाजपने शिंदेंना पर्यायही दिले आहेत. पण त्यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं, असा प्रश्न शिंदेंसमोर उभा राहू शकतो.

 

 

 

 

राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत. पक्षफुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत कायम आहेत. त्यांच्या विरोधात रविंद्र फाटक, नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचा विचार शिंदेंकडून सुरू आहे.

 

 

पण या दोन्ही उमेदवारांचा विचारेंसमोर निभाव लागण्याची शक्यता कमी असल्याचं भाजपनं शिंदेंना सांगितलं आहे. या मतदारसंघातून संजीव नाईक यांना उमेदवारी द्या, अशी भाजपची मागणी आहे.

 

 

 

ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाण्यासह नवी मुंबईतील काही भागांचा समावेश होतो. ठाण्यात शिंदेंसह भाजपचं प्राबल्य आहे. नवी मुंबईत नाईक कुटुंबाचा दबदबा आहे.

 

 

 

 

त्यामुळे संजीव नाईक यांना उमेदवारी दिल्यास महायुतीतील सर्व पक्ष मिळून त्यांना निवडून आणू शकतो, असं भाजपचं गणित आहे. संजीव नाईक हे भाजपचे नेते आहेत.

 

 

 

नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची शक्यता अधिक असल्याचा भाजपचं सर्वेक्षण सांगतं. इथून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता वाढते, असं भाजपकडून शिंदेंना सांगण्यात आलं आहे.

 

 

 

मध्यंतरी पंतप्रधान मोदींनी नाशिकचा दौरा केला. काळाराम मंदिराला भेट दिली. त्याचा दाखला देत भाजपनं या मतदारसंघातून हिंदुत्त्ववादी चेहऱ्याचा आग्रह धरला आहे.

 

 

 

 

शांतीगिरी महाराजांचा लाखोंचा भक्त समुदाय आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता अधिक असेल, असा भाजपचा होरा आहे.

 

 

 

कोल्हापुरातून समरजीत घाटगे किंवा धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपनं शिंदेंकडे केली आहे. दोघेही भाजपचे नेते आहेत.

 

 

 

हातकणंगले लोकसभेसाठी भाजपनं विनय कोरेंच्या नावाचा आग्रह धरला. विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक असून ते विधानसभेचे आमदार आहेत.

 

 

 

कोल्हापूर आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार शिंदेंसोबत आहेत. भाजपच्या मागणीप्रमाणे उमेदवाऱ्या दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं, असा प्रश्न शिंदेंसमोर असेल. त्यामुळे शिंदे भाजपच्या मागण्यांबद्दल फारसे अनुकूल नसल्याचं कळतं.

 

 

 

 

राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेले असताना तसेच भाजप आणि शिंदेसेनेच्या विद्यमान १२ खासदारांच्या पत्ता कापण्याच्या जोरदार चर्चा असताना नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचा उमेदवार जाहीर केला.

 

 

 

 

नाशिक लोकसभेची जागा महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहणार, की भाजपकडे जाणार याचा तिढा कायम आहे.

 

 

 

अशा संदिग्ध वातावरणात शिवसेना शिंदे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन करून एकनाथ शिंदे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिलेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

 

 

 

खासदार हेमंत गोडसे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. आपल्याला पुन्हा एकदा त्यांना दिल्लीत पाठवायचे आहे, असे आवाहन करताना त्यांनी गोडसे यांच्या उमेदवारीची कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली.

 

 

 

नाशिकमधून हेमंत गोडसे लोकसभेच्या रिंगणात असतील, आपणल्याला त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

 

 

 

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून ही जागा भाजपकडे जाण्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर ही जागा शिवसेनेकडेच राहिल, अशी विनंती आपल्या भाषणातून खासदार हेमंत गोडसे यांनी केली.

 

 

 

 

त्यांची विनंती मान्य करून नाशिकची जागेवर तोडगा निघाल्याचे सांगत हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा दिल्लीत पाठवा, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केले.

 

 

 

 

 

नाशिकमधून इच्छुक असलेल्या तसेच प्रचारालाही आरंभ केलेल्या शांतिगिरी महाराजांनी रविवारी (दि. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नाशिकचा ‘सस्पेन्स’ आणखी वाढला होता.

 

 

 

 

परंतु आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने नाशिकचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *