शिक्षकांना आता ड्रेस कोड;नावा समोर Tr लागणार
Teachers will now have dress code; Tr in front of name
जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात, वकिलांच्या नावामागे Ad लावतात तसंच आता राज्यातील शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार आहे.
शिक्षकांच्या नावा मागे Tr लावण्याचा निर्णय शिक्ष खात्याने घेतला आहे. शिक्षकांच्या नावा मागे Tr लावावे असा आदेशच जारी करण्यात आला आहे.
यापुढे शिक्षकांच्या नावापुढे इंग्रजीमध्ये Tr लिहीले जाणार आहे. तर, मराठीमध्ये शिक्षकांच्या नावामागे टी असं लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नावामागे Tr अक्षर लागल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक हे त्यांच्या नावानेच ओळखले जाणार आहेत. शिक्षकांच्या नावावरुनच त्यांचे प्रोफेशन समजणार आहे.
राज्यामधील शालेय शिक्षकांना आता नवा ड्रेस कोड लागू होणार आहे. राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांनी कुठले कपडे घालावेत याबाबत शासन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांनी सारखा ड्रेस घालावा असं या शासन पत्रकात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांच्या कपड्याचा रंग कुठला असावा याबाबत शाळेने निर्णय घ्यावा असं शासनाने सांगितलं आहे.
यामुळे आता शिक्षकांनी कोणत्या रंगाचे कपडे घालवेत हे शाळा ठरवणार आहे. फक्त कपडेच नाही शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या चप्पल घाल्याव्यात याबाबत देखील निर्णय घेण्याक आला आहे.
या शासन पत्रकात शिक्षकांनी कुठले बूट घालावेत. कशा चपला घालाव्यात महिला शिक्षकांच्या चपला कशा असाव्यात याबाबत नियमावली ठरवण्यात आली आहे.
महिला शिक्षकांनी साडी अथवा चुडीदार /सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा प्रकारचा भारतीय पोषाक परिदान करुनच शाळेत यावे. पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर परिधान करावी.
पॅन्ट शर्ट अगदी व्यवस्थित इन केलेले असावे असे देखील ड्रेस कोडमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पुरुष तसेत महिला शिक्षकांनी
जीन्स पँट अथवा वेस्टर्न आऊटफीट परिधान करुन शाळेत येवू असे देखील या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.