राज ठाकरेंची मनसे महायुतीत ?

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत आणखी एक भिडू सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा घटकपक्ष बनण्याची दाट शक्यता आहे.

 

 

 

वेळात राज ठाकरे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. या भेटीत महायुतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

राज ठाकरे काल रात्रीच दिल्लीत पोहोचले आहेत. राज ठाकरे महायुतीत गेल्यास त्यांना लोकसभेच्या एक ते दोन जागा मिळू शकतात.

 

 

दक्षिण मुंबई मतदारसंघ राज यांच्या मनसेला सोडला जाण्याची दाट शक्यता आहे. इथून राज ठाकरेंचे विश्वासू नेते बाळा नांदगावकर निवडणूक लढवू शकतात.

 

 

 

राज ठाकरेंनी महायुतीत यावं, त्यांच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर लढावं, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला होता. पण भाजपच्या चिन्हावर लढण्याची अट राज यांना अमान्य होती.

 

 

 

 

 

त्यांनी आपली भूमिका मांडली. माझे उमेदवार रेल्वे इंजिन चिन्हावरच लढतील अशी ठाम भूमिका राज यांनी मांडली. ती भाजपनं मान्य केली. त्यामुळे युतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

 

 

२०१४ मध्ये राज ठाकरेंनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा केला. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलवर त्यांनी स्तुतीसुमनं उधळली.

 

 

 

लोकसभा निवडणुकीत माझे उमेदवार विजयी झाल्यास ते मोदींना पाठिंबा देतील, अशी घोषणा त्यांनी केली. या निवडणुकीत राज यांनी

 

 

 

भाजपविरोधात उमेदवार दिले नाहीत. पण उद्धव ठाकरेंच्या सेनेविरोधात उमेदवार उभे केले. पण त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

 

 

 

२०१९ मध्ये राज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी ते मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे मैदानात उतरले. पुलवामात सैन्यावर झालेल्या हल्ल्यावरुन त्यांनी तोफ डागली.

 

 

 

पुलवाम्यात हल्ल्यासाठी वापरलेलं आरडीएक्स आलं कुठून असा सवाल त्यांनी विचारला. डिजिटल गावातील खरी परिस्थिती दाखवत त्यांनी सरकारची पोलखोल केली.

 

 

 

 

त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. लाव रे तो व्हिडीओनं चांगलीच हवा केली. पण या निवडणुकीत भाजपनं नेत्रदीपक यश मिळवलं. त्यावर राज यांनी अनाकलनीय अशी प्रतिक्रिया दिली होती.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *