जिल्हाधिकारी कार्यालयात १५ हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक
Arrested red-handed while taking bribe of 15 thousand in collector office

रिव्हॉल्वर परवाना नूतनीकरण करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकास
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा दंड दोनच्या महसूल सहाय्य्क उमेश्वर गणवीर (वय ४०) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तुमसर येथील तक्रारदाराच्या नावाने ३२ बोर रिव्हॉल्वरचा परवाना आहे. २०२१ मध्ये सदर रिव्हॉल्वर परवानाचे नूतनीकरण केले होते.
तीन वर्षाने त्याचे नूतनीकरण करण्याचे आवश्यक असल्याने ११ डिसेंबर २०२३ ला परवाना नूतनिकरण शुल्क भरुन अर्ज दाखल केला होता. मात्र अद्याप परवाना नूतनीकरण झालेला नव्हता.
परवाना नूतनीकरणाबाबत १८ मार्चला तक्रारदारने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक उमेश्वर गणवीर यांचेकडे चौकशीसाठी गेले होते.
यावेळी उमेश्वर गणवीर यांनी परवाना नूतनीकरण करुन देण्याकरीता १५ हजार रुपयांची (Bribe) मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पळताळणी करून सापळा रचला. दरम्यान महसूल सहाय्यक उमेश्वर गणवीर याने १५ हजारांची लाच स्विकारतांना पथकाने अटक केली आहे.