नाना पटोलेंचे भाजपवर गंभीर आरोप

Nana Patole's serious allegations against BJP

 

 

 

 

 

भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाचा वा शहराचा नव्हे तर भाजप नेत्यांचाच सर्वाधिक ‘विकास” झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

 

 

 

विकसित भारताचे खोटे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपची आता जनताच घरवापसी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

काँग्रेसचे नागपूर उमेदवार विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर पटोले यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,

 

 

 

 

यावेळी लोकसभा निवडणूक नसून विचारांची लढाई आहे. नागपूर हे नेहमी काँग्रेसच्या विचारांचे शहर राहिले आहे. विचारांच्या लढाईत काँग्रेस महाविकास आघाडीचा विजय होईल.

 

 

 

 

सिमेंट रोड म्हणजे शहराचा विकास होत नाही. ज्या विकासाचे भाजपचे कार्यकर्ते गोडवे गात आहेत, त्यांचा स्वतःचा व नेत्यांचा

 

 

 

 

किती आर्थिक विकास झाला हे त्यांनी आधी जाहीर करावे, असे पटोले म्हणाले. नितीन गडकरी यांनी सिमेंट रस्ते बांधून नागपुरात तापमान वाढवण्याचे काम केले.

 

 

 

गरज नसताना रस्ते खोदले जात आहेत. वारंवार तोडले जात आहेत. त्यांच्या अनियोजित विकासामुळे पावसाळ्यात अर्धे नागपूर पाण्याखाली बुडाले होते.

 

 

 

 

त्यामुळे विकासावर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही, असेही पटोले यांनी ठणकावले. भाजपच्या दहा वर्षांत महागाई कमी झाली नाही.

 

 

 

 

शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव दिला जात नाही. याउलट श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीनच गरीब झाले आहे.

 

 

 

 

 

त्यामुळे जनतेनी भाजपला कशासाठी मतदान करावे, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. बेरोजगारांना नोकरी देऊ शकलो नाही तर

 

 

 

त्यांना पैसे देण्यासंदर्भात आम्ही गॅरंटी दिली आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, यांसारखी २५ कामे करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही पटोलेंनी सांगितले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *