आज मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय

Seven major decisions in the cabinet meeting today ​

 

 

 

 

राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यत आली.

 

 

 

या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातीस 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे.

 

 

 

तर बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी करण्यात आल्या आहेत.

 

 

 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय
मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार ( जलसंपदा विभाग)

 

 

राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
( ग्रामविकास विभाग)

 

 

 

आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
( उच्च व तंत्रशिक्षण)
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.

 

 

 

1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)

 

 

 

 

कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रीकॅबिनेट बैठक घेतली. य बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

 

 

 

महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 चा अहवाल कॅबिनेटसमोर सादर केला . त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांनी

 

 

 

सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मुश्रीफ आणि भुजबळ उपस्थित नव्हते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *