परभणीच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकरांचा इशारा,सुप्रिया सुळे म्हणाल्या घृणास्पद कृत्याचा निषेध

Prakash Ambedkar's warning on Parbhani incident, Supriya Sule condemns the heinous act

 

 

 

परभणीत काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी हल्लेखोरांना अटक करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

 

परभणीत संविधानाच्या प्रतिची विटंबना करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. त्यानंतर परभणीत आज बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे.

 

आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या काही गाड्यांवरही दगड फेकले. ज्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.

 

शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, परभणीतील या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी

 

सरकारला इशारा दिला असून येत्या २४ तासांत सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

“बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले.

 

त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनांमुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका.

 

शांतता राखा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. येत्या २४ तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

 

“परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे.

 

हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध.”

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आला असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली .

 

शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  परभणीत तणावपूर्ण शांतता पाहण्यास मिळते आहे.

 

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1866737727510569287?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1866737727510569287%7Ctwgr%5Ec53bffdeba501e7605d06da5099437fff8ec2a7d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fprakash-ambedkar-gave-warning-said-arrest-people-in-parbhani-within-24-hours-who-insulted-constitution-scj-81-4763139%2F

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *