अशोक चव्हाणांनी काँग्रेसला संपवण्याचा प्लान केला होता;काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
Ashok Chavan had planned to end the Congress; sensational claim of the Congress leader
काँग्रेसमध्ये काय राहिलंय, असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. अशोक चव्हाण यांच्या या टीकेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावलं आहे. त्यांनी राजयोग भोगला आहे.
उलट काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाण यांनी प्लान केला होता, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधतना भाजप नेते अशोक चव्हाण आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.
अशोक चव्हाण यांना काँग्रेसवर बोलायचा आता अधिकार नाही. त्यांच्या भोकर विधानसभेत त्यांची काय अवस्था आहे? लोक त्यांना येऊ देत नाही ही अवस्था आपण बघत आहोत.
त्यामुळं काँग्रेसवर बोलणं त्यांनी आता टाळावं. काँग्रेसच्या नावावर खूप कमविलं तुम्ही, काँग्रेसच्या नावानं खूप राजयोग भोगला.
काँग्रेसला कसं संपवायचं याचा त्यांनी प्लॅन केला होता, बरं झालं आज ते आमच्यात नाही, असा टोला नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
काँग्रेसवर बोलणं आता टाळलं पाहिजे. ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याचं आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोकं तुम्हाला माफ करणार नाही, असा हल्लाही पटोले यांनी चढवला.
यावेळी नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. मात्र आम्ही महाविकास आघाडीत आहोत.
त्यांना काही जाहीर करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जाहीर करायचं असतं. एखाद्या पक्षाबाबत भूमिका घेणं योग्य नाही.
ते महान आहेत. त्यांच्याबद्दल फारसं काही बोलता येत नाही. परवा मी जाणार आहे अकोल्याला. या सर्वांचं वर्णन मी त्याठिकाणी करणार आहे, असं नाना म्हणाले.
आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेत पुढे गेलो होतो. मतांचं विभाजन होऊ नये असं वाटत होतं. पण त्यांनी आमची वारंवार चेष्टा केली.
अडीच – तीन महिने तुमच्याच मीडियावर ती दाखवली होती. तरीही काँग्रेसच्या वतीने मी हायकमांडला समजून सांगितलं होतं.
आम्ही पूर्ण तयारीने होतो. पण, त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये उमेदवार उभे करायचं काम सुरू केलं, याचा अर्थ त्यांना
मैत्री करायचीच नव्हती, हे त्याच्यातून सिद्ध होतं. त्यांनाच आघाडी नको होती, म्हणूनच त्यांनी उमेदवार जाहीर केले, असा दावाही त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसचे काही नेते खासगीत बोलताना करतायेत. जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती.
या चर्चेमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांवर दावा करण्याऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आला. त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघावर दावा केला.
सांगली , भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई ही याची काही उदाहरणं. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का, असा संशय आता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडूनच केला जातो. काँग्रेस नेत्यांची खाजगीत अशी चर्चा सुरू होती.
महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती. या चर्चेदरम्यान त्यांनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदार संघावर
दावा करण्याऐवजी इतर मतदार संघावर दावा केला. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही मतदार संघावर दावा केला आहे.
रामटेक, कोल्हापूर आणि अमरावती या मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा होता. पण हे मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे सांगली,
भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईचा पेच हा वाढला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ केला का? हा संशय काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.