इस्राइल-हमास युद्ध ;लादेनच्या पत्रामुळे अमेरिकेत ‘खळबळ’
Israel-Hamas war; Laden's letter causes 'excitement' in America
दहशतवादी संघटना अल कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचे २० वर्षांपूर्वीचे एक पत्र टिकटॉकवर व्हायरल होत आहे. काही सोशल मीडिया युझर्संनी हे पत्र व्हिडिओच्या माध्यमातून एक्सवर शेअर केले आहे.
या पत्रामध्ये लादेनने 9/11 हल्ला का केला आणि अमेरिकेविरोधात जिहाद का सुरु केला याचा उल्लेख केला होता.
विशेष म्हणजे सध्या हमास आणि इस्राइलमध्ये संघर्ष सुरु आहे.
या संघर्षामध्ये अमेरिकेने इस्राइलला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. अशावेळी हे पत्र व्हायरल करण्यात आल्याने शंका उपस्थित केली जात आहे. टिकटॉक या चीन पुरस्कृत सोशल माध्यमातून हा प्रकार करण्यात आलाय.
त्यामुळे चीन अमेरिका विरोधात अजेंडा राबवत असल्याची टीका होत आहे. त्यामुळेच अमेरिकेत टिकटॉक बॅन करण्याची मागणी केली जात आहे.
११ डिसेंबर २००१ मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर हे पत्र एक वर्षानंतर लादेनने लिहिले होते. लादेनच्या पुढाकाराने झालेल्या या हल्ल्यात ३००० पेक्षा जास्त नागरिकांना मृत्यू झाला होता.
एनबीसी न्यूजच्या माहितीनुसार, पत्र ज्यूंच्या विरोधातील आहे. लादेनने अमेरिकी नागरिकांना या पत्रातून काही प्रश्नांची उत्तर दिली होती.
आम्ही तुमच्यासोबत का लढत आहोत? विरोध का करत आहोत? आम्हाला तुमच्याकडून काय हवं आहे? अशा प्रश्नांची उत्तरं त्यात होती.
पत्रावरुन दोन गट पडले आहेत. काहींनी यावर सहानुभूती दाखवली आहे, तर काहींनी याची निंदा केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेला इराक आणि अफगाणिस्तानमधील आपल्या भूमिकेचं पुनर्मूल्यांकन करावे लागले होते.
सध्या अमेरिका मध्य आशियातील युद्धात इस्राइलची साथ देत आहे. यासंदर्भात या पत्राकडे पाहिलं जात आहे.
लादेनचे पत्र अनेकदा शेअर करण्यात आले असून त्याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. वॉशिंग्टन पोस्टनुसार, माजी अल कायदा प्रमुखाने अफगाणिस्तान, इराक, सोमालिया, चेचन्या
आणि लेबनॉनमधील हस्तक्षेपावरही टीका केली होती. दरम्यान, टिकटॉकवरुन या पत्राला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आल्याने चीनचा यात हात असल्याचं बोललं जातंय.