पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट;म्हणाले राष्ट्रवादीचा दगा दिला
Prithviraj Chavan's big secret blast; said he betrayed the NCP
राज्यात 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार जाऊन भाजप सरकार स्थापन झाले. यास राष्ट्रवादी काँग्रेसच जाबाबदार असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे.
राष्ट्रपती राजवट लागली नसती आणि मैत्री तुटली नसती तर राज्यात पुन्हा एकदा आघाडीचे सरकार आले असते, असा दावाही चव्हाणांनी केला आहे. एका मुलाखतीत चव्हाणांनी राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत.
2014 मध्ये भाजपचे सरकार कसे आले, याचे आतापर्यंत व्यवस्थित विश्लेषण झाले नाही, असे सांगून चव्हाणांनी त्यावेळी काय घडले, त्याचे परिणाम काय झाले, याची सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात राष्ट्रपती राजवटीचा आग्रह धरला. त्यांनी सरकारला असलेला पाठिंबा काढल्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर राज्यपालांनी राज्यात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत हंगामी मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर जाबाबदारी दिली होती. त्यानंतरही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती केली होती.
एकीकडे भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याची घोषणा केली. त्यानंतर दुसरीकडे आर्ध्या तासातच राष्ट्रवादीने काँग्रेसशी युती तोडली. या घडामोडी अचानक घडल्या असल्या तरी ते ठरवून झाल्याचेच मला वाटते.
राष्ट्रपती राजवट लागल्याने राज्यातील लोकांत नकारात्मक संदेश गेला. त्यातूनही आम्ही एकत्र लढलो असतो तर राज्यात पुन्हा आमचेच सरकार आले असते, असेही चव्हाण म्हणाले.
काँग्रेसने 288 पैकी 138 जागांवर विधानसभा लढण्याची तयारी केली होती. मात्र अचनाक युती तुटल्यामुळे आम्हाला राज्यातील सर्व 288 जागांवर तयारी करावी लागली.
परिणामी, हे लोक काही सत्तेत येणार नाही, असा संदेश जनतेत गेला. यातूनच भाजपचे सरकार सत्तेत आले. अन्यथा आमचेच सरकार आले असते.
त्यावेळी मोदी लाट होती, हे मान्य केले तरी राष्ट्रपती राजवट लावण्यास भाग पाडून सरकार पाडण्यात आले, याकडेही चव्हाणांनी लक्ष वेधले.