असदुद्दीन ओवेसी म्हणाले गोमांसला विरोध करणाऱ्या भाजपला एलेक्ट्रोरल बॉण्डचे पैसे कसे चालतात?

Asaduddin Owaisi said how does the electoral bond money work for the BJP, which opposes beef?

 

 

 

 

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निवडणुकीच्या दरम्यान करत असलेल्या भाषणांमध्ये मासबंदीच्या उच्चार करत आहे. श्रावण महिन्यामध्ये मास खाल्लं जातंय असं ते म्हणतात.

 

 

 

 

 

मात्र मी ३० दिवस रमजान महिन्यामध्ये रोजा पकडतो. त्या काळामध्ये तुम्ही जेवण करू नका असं मी म्हटलं तर तुम्हाला चालेल का?

 

 

 

मांस खाण्याबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मांस विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून दिलेले इलेक्टोरल बॉण्ड कसे चालतात? असा रोकडा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षातर्फे खासदार इम्तियाज जलील हे उमेदवार आहेत.

 

 

 

इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. ओवेसी यांची वैजापूर तालुक्यामध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

 

 

 

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, “एकीकडे मांस विक्री करणाऱ्या कंपनीकडून इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे घ्यायचे आणि दुसरीकडे मात्र मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर बंदी ठेवायची

 

 

 

हे गरिबांवर व त्यांच्या पोटावर पाय मारण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखी आम्हाला इलेक्ट्रोरल बॉण्डची गरज नाही”

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये दलित, मुस्लिमान विरोधात जे काही वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले, त्यावेळी शिवसेना-भाजप हे एकत्र होते.

 

 

 

एनआरसी, सीएए, राम मंदिर, तीन तलाक हे कायदे तयार होत असताना शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत होती आणि त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला होता.

 

 

 

त्यामुळे यांचा खरा चेहरा ओळखा. त्यामुळे राज्यातले भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आपले विरोधक असून आपल्याला त्यांच्या विरोधात लढा द्यायचा आहे, असे ओवेसी म्हणाले.

 

 

 

 

गेली वीस वर्ष खान हवा की बाण यावर राजकारण करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला. एवढी वर्ष खान हवा की बाण हवा? म्हणणाऱ्या खासदाराचा बाण आता कुठे गेला असावा असे विचारत ओवेसी यांनी चंद्रकांत खैरे

 

 

 

 

यांच्यावर टीका केली. एखादा माणूस अनावश्यक बडबड करतो, त्यामुळे त्याच्या गळ्यात साप पडतो, अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची झाली आहे. यामुळे त्यांना आता मशाल चिन्हावर निवडणूक लढावी लागली, असा चिमटा ओवीसी यांनी काढला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *