मोदी परभणीला जातीयवादाचे विष पेरण्याासाठी येत आहेत;गणेशराव दुधगावकर
Modi is coming to Parbhani to sow communal poison; Ganeshrao Dudhgaonkar

मोदी परभणीला जातीयवादाचे विष पेरण्याासाठी येत आहेत.अशा शब्दात परभणीचे माजी खासदार ऍड. गणेशराव दुधगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
घनसावंगी तालुक्यातील शहागड येथे मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे मामा वसंतराव (आण्णा ) सपाटे यांच्या हस्ते अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर उदघाटन करण्यात आले
.यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना दुधगांवकर म्हणाले.परभणी लोकसभा मतदारसंघातील अंतरवली सराटी येथे दोन कोटी जनता एका ठिकाणी जमते,
आरक्षणाची मागणी करतात पण मोदीजी त्यांच्या मागणीवर काहीच बोलत नाहीत. संसदीय लोकशाही मध्ये जनतेच्या मागणीला दूर्लक्ष केले जातेय
असे सांगत मोदींना येथे मते मागण्याचा अधिकारच उरला नाही अशा शब्दात दुधगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टिका केली.
यावेळी उमेदवार समीर दुधगावकर, तात्यासाहेब सपाटे. बप्पासाहेब खरात,परमेश्वर राखोडे,समीर कुरेशी,अशोक राखोंडे,अप्पासाहेब काठोटे,पुरुषोत्तम जंगले,
अभिषेक लहुटे,अमोल भाकड,किशोर शिंदे,विकास मुळे,गहिनीनाथ महाराज,बालासाहेब वझुरकर,शेषेराव मोहीते,अमोल सपाटे, सय्यद बाबर,किशोर शिंदे, भुजग नाटकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. व्यंकटेश काळे पाटील यांनी केले.