मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी
Chief Minister Shinde's message to Shiv Sena ministers
;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांची त्यांच्याच गटातील आमदारांनी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. काही आमदारांनी २ ते ३ मंत्र्यांची तक्रार केल्याची माहिती आहे.
आमदारांची कामे होत नाहीत अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मंत्र्यांना वेळोवेळी सांगून देखील कामे करत नाहीत अशी तक्रार त्यांनी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या आधीही आमदारांनी या ३ मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता १५ ते १६ आमदारांनी या ३ मंत्र्यांबाबत पुन्हा एकदा कामे करत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पक्षातील आमदार शिवसेना मंत्र्यांकडे काम घेऊन आल्यानंतर काम होत नसल्याची तक्रार आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे केली.
आमदारांनी याबाबतची नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली. आमदारांच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तंबी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच पक्षातील सर्व विधानसभा सदस्यांना अधिवेशन कालावधीत जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी देण्यात आल्या आहेत.
दरम्यान हिवाळी अधिवेशनानंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. अशातच काही मंत्र्यांची खाते किंवा आमदार बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ३ मंत्री कोण आहेत याबाबतची माहिती समोर आलेली नाही. आगामी निवडणुका आणि कामे यामुळे एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.