भाजपची सत्ता असूनही सहा जिल्ह्यांमध्ये 0 मतदान
0 polling in six districts despite BJP ruling
नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता आहे. असं असूनही नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शुन्य टक्के मतदान झालं आहे. नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूक मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांवर मतदार फिरकलेदेखील नाहीत.
त्यामुळे चार वाजेपर्यंत जवळपास शून्य टक्के मतदान झाले आहे.
नागालँडमधील एका लोकसभा मतदारसंघामध्ये शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येथे ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.
केंद्र सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याने मतदारांमध्ये निरुत्साह आहे. नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत.
पैकी २० मतदारसंघांमध्ये मतदारांनी बहिष्कार टाकलेला आहे. याचा परिणाम सहा जिल्ह्यांमध्ये दिसून येतोय. निवडणूक आयोगाने संघटनेला याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मतदान हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचं आणि मतदारांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तसं आवाहन केल्याचं संघटनेने म्हटलं आहे.