भावना गवळी यांनी सांगितले खासदारकीची उमेदवारी न मिळण्याचे कारण
Bhavna Gawli said the reason for not getting candidature for MP

माझे काही भाऊ मागील काळातही भावना गवळीला उमेदवारी देऊ नका म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते
, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी यांनी केला आहे. आज वाशिममध्ये झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार भावना गवळी यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
माझी उमेदवारी कापण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली हे हेमंत पाटलांनी जाहीर केलेच आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता संजय राठोड यांच्यावर रोष व्यक्त केला आहे.
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या वाशिम इथ शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात त्या असं म्हणाल्या.
भावना गवळी म्हणाल्या की, ”पत्रकार मला विचारते तुमच्या झाशीचं काय झालं? याबाबत हेमंत पाटील यांनी सांगितलं, याची स्क्रिप्टकोणी लिहिली कसं कसं काय झालं, हे त्यांनी आधी सांगितलं आहे. खासदारकी जरी मिळाली असली तरीही टिकवताना खूप संघर्ष केला आहे.
त्या म्हणाल्या, ”मागच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे माझ्या काही भावाने माझ्या तक्रारी केल्या
आणि यांना उमेदवारी देऊ नका, असं सांगितलं. मात्र तरीही मला उमेदवारी मिळाली आणि माझा जुना रेकॉर्ड मोडत मी मोठ्या बहुमताने विजयी झाले.”
भावना गवळी म्हणाल्या, ”माझी उमेदवारी कापण्याचं कारण सांगा म्हणून लोक मला विचारतात. मात्र याचं कारण माझ्या नेत्यालाच कळलं नाही तर भावना गवळीला काय कळेल?
हेमंत पाटील यांना इकडे का आणले? हे त्यांनाही माहित नाही. तुम्हा आम्हा सर्वांना हे कोडंच आहे. शेवटच्या संघर्षामध्ये मला कुठेतरी थांबायचं काम पडलं, परंतु माझ्या मनामध्ये खंत होती, ती मी बोलून दाखवली.”
त्या पुढे म्हणाल्या की, ”मी 25 वर्ष शिवसेनेसाठी लावले आहेत. त्याचा मोबदला मला निश्चित मिळेल. नेते माझ्या विरोधात थोडेफार असू शकतात. मात्र सर्वसामान्य जनता माझ्या विरोधात कधीच नाही,
हे मी मोदींच्या गॅरंटीसह भावना गवळीच्या गॅरंटीने सांगते. एक झाशी माझी गेली असेल मात्र माझ्यामध्ये क्षमता आहे. विधानसभेमध्ये शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला विश्वासात घेऊन उमेदवार देणार आहेत, त्यावेळी आपण आपली ताकद दाखऊ.”