मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्य्स्फोट म्हणाले “फडणवीसासह आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”

Chief Minister Shinde's secret blast said "conspiracy hatched to arrest three more BJP leaders along with Fadnavis"

 

 

 

 

भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मगळवेढ्यातील एका सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.

 

 

 

पाटील म्हणाले होते. मविआ सरकारच्या काळात कोणत्याही क्षणी फडणवीसांना अटक झाली असती. मविआ सरकारच्या काळात ३३ महिने आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे.

 

 

 

परंतु, आम्हाला खात्री होती हेही दिवस सरतील. परंतु, आमच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले. ते मुख्यमंत्री झाले आणि आमचं सरकार आलं.

 

 

 

 

पाटील यांच्या या दाव्यावर तेव्हाच्या मविआ सरकारमधील मंत्री आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

एकनाथ शिंदे यांनी रविवारी (२१ एप्रिल) टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

चंद्रकांत पाटील यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या अटकेबाबतच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मला त्याबाबत अशी माहिती आहे की, महाविकास आघाडीच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे

 

 

 

तर भाजपा नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मविआ सरकारने काही खटले दाखल करून

 

 

 

 

या लोकांना अटक केली असती. तसेच २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार फोडण्याचाही कट त्यांनी (मविआने) रचला होता.

 

 

 

 

महाविकास आघाडीचं सरकार असताना आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. तेव्हा मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्या ३३ महिन्यांच्या काळात आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे.

 

 

 

यावेळी शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली? त्यावर शिंदे म्हणाले, मला वर्षा बंगल्यावर बोलावलं गेलं आणि तास वाट पाहायला लावली.

 

 

 

 

हे नेहमीच व्हायचं. दोन वर्षे हे सातत्याने होत होतं. अखेर, राज्यसभा निवडणुकीवेळी मला चर्चेपासून दूर ठेवण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातंदेखील

 

 

 

 

काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला झेड प्लस सुरक्षा दिली गेली नाही. अशा अनेक गोष्टी घडत होत्या.

 

 

 

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं कशावरून वाजलं? पक्षात बंडखोरी करण्याचा निर्णय त्यांनी काय घेतला असा प्रश्न सातत्याने विचारले जातात. टाईम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मुलाखतीतही ते बोलत होते.

 

 

उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मला वर्षा बंगल्यावर बोलावलं गेलं आणि वाट अनेक तास वाट पाहायला लावली.

 

 

 

हे जवळपास दोन वर्ष सुरू होतं. शेवटी, राज्यसभा निवडणुकीवेळी मला यापासून बाहेर ठेवण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातंही काढून घेण्याचा प्रयत्न झाला.

 

 

 

मला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला झेड प्लस सुरक्षा दिली गेली नाही. मी त्यांना अनेकदा भाजपाबरोबर जाण्याची विनंती केली. या विनंतीला उद्धव ठाकरेंनी होकारही दर्शवला.

 

 

 

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली होती. निर्णयासाठी त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला गेला. परंतु, याबाबत निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी भाजपाच्या १२ आमदारांनाच निलंबित केलं.

 

 

 

उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली नसताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठित खंजीर खुपसला असा आरोपही एकनाथ शिंदेंवर केला जातो. यावरही त्यांनी खुलासा केला आहे.

 

 

 

ते म्हणाले, “हा कट नव्हता. ही बंडखोरी होती. विधानसभेत राज्यसभेसाठी मतदान सुरू होतं तेव्हा याचं नियोजन आखण्यात आलं.

 

 

 

किंबहुना मी सर्व आमदारांना संजय राऊतांना मतदान करण्याचं आवाहन करून सूरतसाठी निघालो. आम्ही संजय राऊतांना हरवू शकत होतो. पण आम्ही तसं केलं नाही.

 

 

 

“आम्ही सूरतला पोहोचेपर्यंत आम्हाला खूप कॉल आले. वसईतील एका चहाच्या स्टॉलवरून मी उद्धव ठाकरेंनाही फोन केला. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफरही दिली.

 

 

 

पण आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना म्हणालो. मी खुलेआमपणे बाहेर पडलो होतो. त्यांनी दिल्लीतही कॉल केला होता. शिवसेना आणि भाजपाची युती होऊ शकते,

 

 

 

 

मग एकनाथ शिंदे कशाला पाहिजेत? असंही ठाकरे भाजपाला म्हणाले. पण त्यावेळी त्यांच्या हातात काहीही उरलेलं नव्हतं”, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 

 

 

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असली तरीही महायुतीच्या जागा वाटपाचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, “जागा वाटपासाठी उशीर झालेला नाही.

 

 

 

आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जागा वाटपासाठी वाद झालेला नाही. आम्ही १६ जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तर, मुंबईतून ३ जागा लढवणार आहोत.

 

 

 

 

२०१९ मध्ये आम्ही ४२ जागा जिंकलो होतो, हा रेकॉर्ड आता आम्ही मोडणार आहोत. सर्वाधिक मताधिक्क्यांनी आमचे सर्व उमेदवार जिंकून येतील.”

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *