कोरोनाची लस घेतलेल्याना हार्ट अटॅक,थ्रोम्बोसाइटोपेनियाचा रोग ;कंपनीने केले मान्य

Heart attack, thrombocytopenia disease in those who took corona vaccine; the company accepted

 

 

 

 

 

ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकानं करोना प्रतिबंधक लस तयार केली होती. ही लस अनेक देशातील नागरिकांनी घेतली होती. आता ॲस्ट्राझेनेका कंपनीनं या लसीचे दुष्परिणाम असू शकतात हे मान्य केलं आहे.

 

 

 

ॲस्ट्राझेनेका ही गोष्ट यूकेमधील हायकोर्टात मान्य केलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामामुळं थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम सारखा धोकादायक आणि दुर्मिळ आजार होऊ शकतो.

 

 

हे कंपनीनं मान्य केलं असून कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळं तुम्हाला देखील आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागत आहे काय?

 

 

 

 

थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम चा आजार नेमका कसा असतो, त्याची लक्षण काय असतात जे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम या आजाराबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की ॲस्ट्राझेनेकाची लस काही देशांमध्ये कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या ब्रँड नेमच्या नावाखाली विक्री केली होती.

 

 

 

भारतात कोविशिल्ड ही प्रतिबंधक लस बहुतांश लोकांनी घेतली होती. आता कंपनीनं मान्य केलंय की या लसीचे दुष्परिणाम आहेत.टीटीएस म्हणजेच थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम मुळं शरिरात रक्ताच्या गाठी बून शकतात,

 

 

 

त्यामुळं ब्रेन स्ट्रोक, कार्डियक अरेस्ट म्हणजेच ह्रदयविकाराचा धक्का बसू शकतो. यामुळं प्लेटलेटसची संख्या देखील कमी होऊ शकते.

 

 

 

थ्रोम्बोसाइटोपेनियाची लक्षणं

ह्रदयविकाराच्या धक्क्याची लक्षणं
नाक, दातातून रक्त येणे

 

 

महिलामध्ये पीरियडच्या काळात अतिरिक्त रक्तश्राव
लघवीतून रक्त येणे
त्वचेवर लाल रंगाच्या पुळ्या येणे

 

 

 

 

तज्ज्ञांनुसार थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार काही दिवसांसाठी किंवा कित्येक वर्षांसाठी राहू शकतो. या आजाराच्या गंभीरतेनुसार रुग्णांवर उपचार केले जातात.

 

 

 

कुठल्यातरी औषधामुळं आणि लसीमुळं आज थ्रोम्बोसाइटोपेनिया वर उपचार करण्यापूर्वी डॉक्टर चौकशी करतात. ज्यावेळी प्लेटलेटची संख्या कमी होते

 

 

 

 

त्यावेळी डॉक्टर्स लाल रक्त कोशिका म्हणजेच प्लेटलेटसद्वारे बदलतात. एखाद्या वेळी रुग्णाच्या प्रतिकार क्षमतेचा प्रश्न असल्यास डॉक्टर प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी औषध देतात.

 

 

 

 

ॲस्ट्राझेनेका कंपनी कायदेशीर अडचणींचा सामना करत आहे. जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीनं एक याचिका दाखल केली होती. एप्रिल 2021 मध्ये ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेका यांनी एकत्र येत बनवलेल्या लसीचे डोस घेतल्यानंतर

 

 

 

 

त्यांचं ब्रेन डॅमेज झालं होतं. त्यानंतर काही कुटुंबांनी अशाच प्रकारची तक्रार कोर्टात केली होती. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुष्परिणाम त्यांना

 

 

 

सहन करावा लागल्यानं त्यांनी भरपाईची मागणी केली आहे. ॲस्ट्राझेनेका कंपनीनं देखील लसीमुळं दुष्परिणाम होत असल्याचं मान्य केलं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *