शिवसेना नेत्याचा दावा,अजित पवार भाजपाची साथ सोडणार?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. देशभरात प्रचार सुरु आहे तसाच महाराष्ट्रातही सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांमधून काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका करत आहेत. तर उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार
हे मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी आता अजित पवार, एकनाथ शिंदेंबाबत एक वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा रंगली आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना ही महाराष्ट्रात २१ ते २२ जागा लढत आली आहे. महाविकास आघाडीतही तीन पक्ष आहेत तरीही आमच्या जागा जास्त आहेत.
मात्र शिवसेना फडणवीस गट १२ ते १३ जागा लढत आहेत. त्यांनी जागा कमी करुन घेतल्या आहेत. यालाच एकनाथ शिंदेंचं लोटांगण असं म्हणतात.
भाजपाला महाराष्ट्राबाबत काहीही घेणंदेणं नाही, नव्हतं. महाराष्ट्रातल्या कोणत्या स्वाभिमानाच्या लढाईत भाजपाने पुढाकार घेतला ते दाखवा? स्वातंत्र्य लढ्यात भाजपाचा सहभाग नव्हता,
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही काहीच वाटा नव्हता. सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत.
याला थैलीचं राजकारण म्हणतात. असंही संजय राऊत म्हणाले. तसंच त्यांनी अजित पवारही दैवत बदलतील असा दावा केला आहे.
“अजित पवारांनी दैवत बदललं आहे. २०२४ मध्ये म्हणजेच ४ जूनच्या निकालानंतर सरकार बदलणार. मोदी नसतील आणि अजित पवारांना ईडीची नोटीस येईल. त्यावेळी अजित पवारांनी दैवत बदलेलं असेल.”
असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता अजित पवार भाजपाची साथ सोडणार का? यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
“अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्याकडे स्वाभिमान नाही तर फक्त लाचारी उरली आहे” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.