महायुतीत घमासान ;भाजप आमदाराला इशारा ‘आम्ही बांगड्या भरल्या नाहीत”
Confusion in the Grand Alliance; Warning to BJP MLA 'We have not filled bangles'

विधानसभा निवडणुकीआधी नवी मुंबईतील शिवसेना आणि भाजपमधला वाद टोकाला पोहोचला आहे. भाजप आमदार गणेश नाईक
यांना शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी थेट इशारा दिला आहे. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, असं म्हणत विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.
मित्रपक्ष म्हणून आम्ही आपल्याला मदत करतो, मात्र आमचेच हात छाटणार असाल तर आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशारा विजय चौघुले यांनी एका कार्यक्रमातल्या आपल्या भाषणातून दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेल्या योजनांचं श्रेय ही लोक घेताना दिसतात, मात्र त्याआधी आपला अपप्रचार करत होते. नवी मुंबईतील विरोधी पक्षनेते आपल्यावर टीका करत नाहीत,
मात्र हीच लोक आपल्यावर बोलतात, ना कधी काँग्रेसकडून त्रास झाला, ना शिवसेना उबाठाकडून त्रास झाला, ना भाजपकडून. नाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नेहमी झाल दिला, अशी टीका विजय चौगुले यांनी केली आहे.
याआधी भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि नाईक कुटुंबातला वादही चव्हाट्यावर आला होता. मी बापाचा पराभव केला आहे, ते काय माझ्या नादी लागतील? असा टोला मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे.
बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक यांचे पूत्र आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, यामुळे म्हात्रे आणि नाईक यांच्यात चांगलीच जुंपली होती.
‘सध्या सगळ्यांना आमदार व्हायचं आहे, रिडेव्हलपमेंटमध्ये सगळ्यांना टक्केवारी हवी आहे, पण मी आमदार असेपर्यंत कुणालाही खाऊ देणार नाही.
कुणी येथे येऊन कार्यालय टाकतात, आमदार होईन म्हणतात, अरे मी तुमच्या बापाला पराभव करून बसलेय, तुम्ही मला काय शिकवताय? माझ्या नादाला लागलं तर त्याचा मी नादखुळा केल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिला होता.