सरपंचाच्या घरी अशोक चव्हाण-मनोज जरांगे पाटलांमध्ये चर्चा

Discussion between Ashok Chavan-Manoj Jarange Patal at Sarpanch's house

 

 

 

 

भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

 

 

 

 

अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली. दरम्यान, चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भेटीत काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं आहे.

 

 

 

अशोक चव्हाण हे सरकार ,समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु राहिलं. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार आहे.

 

 

 

सगेसोयरेची आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

 

 

 

आमचा सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे.

 

 

 

 

सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

 

 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शनिवारपासून शांतता रॅले सुरु होणार आहे. त्यापूर्वीच राज्यसरकार अॅक्शनमोडवर आलं आहे. येत्या सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे.

 

 

 

शिंदे समितीचा हा 4 दिवसांचा हैद्राबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहेत.

 

 

 

या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे.

 

 

 

13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *